Posts

Showing posts from July, 2022

शोक संदेश पिंपळगाव हरे येथील दिपक दौलत मालकर यांच्या आई दगूबाई दौलत मालकर याचे दुःखद निधन..

Image
शोक संदेश पिंपळगाव हरे येथील दिपक दौलत मालकर यांच्या आई दगूबाई दौलत मालकर याचे दुःखद निधन..       पिंपळगाव हरेश्र्वर येथील दिपक दौलत मालकर यांच्या आई  दगूबाई दौलत मालकर  वयाच्या 75 व्या वर्षी दि: 30/७/२०२२ शनिवार  रोजी संध्याकळी 6:45 वाजेला अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांचा   अंत्यविधीचा वेळ उद्या दि.31/७/२०२२ रविवार रोजी संजय नगर येथून निघेल.. शोकाकुल :-.दिपक दौलत मालकर व मालकर परिवार पिंपळगाव हरे..त्यांच्या   पुण्य व पवित्र पावन आत्य्मास परमेश्वर दरबारात चिरकाल शांती लाभो व सद्गगती देवो हिच परमेश्वराजवळ विनम्र प्रार्थना.त्याच्या पंच्यात्त एक मुलगा तीन मुली ,दोन नातवंड असा परिवार आहे....

शिंदाड येथे जिल्हा परिषद शाळेला एलईडी टीव्ही सप्रेम भेट.

Image
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले शिंदाड येथे जिल्हा परिषद शाळेला एलईडी टीव्ही सप्रेम भेट.   शिंदाड  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बँक ऑफ बडोदा यांच्या 115 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 30 जुलै 2022 वार शनिवार रोजी एलईडी टीव्ही सप्रेम भेट देण्यात आला बँक ऑफ बडोदा यांच्या 115 वर्धापन दिनानिमित्त  येथील जिल्हा परिषद शाळेला डिजिटल शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने बँक ऑफ बडोदा तर्फे टीव्ही सप्रेम भेट देण्यात आला यावेळी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ बडोदा मॅनेजर राहुल सर व सर्व स्टाफ होता आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे  सरपंच ज्ञानेश्वर भाऊ तांबे उपसरपंच नरेंद्र बापू शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बोरसे यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले सर्व कर्मचारी  उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व शिक्षक स्टाफ तर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ह्या उपक्रमाने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीतून सर्व महिलांना राखीव आरक्षणाचा खरच फायदा होईल का? कि फक्त महिलांचे फोटो वापरून सत्ता पुरुष चालवतील ?

Image
 मुख्य संपादक:-दिपक मुलमुले जिल्हा परिषद निवडणुकीतून सर्व महिलांना राखीव आरक्षणाचा खरच फायदा होईल का? कि फक्त महिलांचे फोटो वापरून सत्ता पुरुष चालवतील ? हा प्रश्न जनसामान्यांना पडलाय. राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राखीव जागांची सोडत जाहीर झाली आहे, सगळे उमेदवार कस्सून तयारीला लागले आहेत.    उमेदवार म्हणताना हे लक्षात येतं की खरंच खरे उमेदवार तयारीला लागलेत का? जिथे जिथे महिला राखीव जागा निघाली तिथले पुरुषच पुन्हा तयारीला लागलेत. म्हणजे ज्या पुरुष उमेदवारांना उमेदवारी हवी होती, तेच आताही निवडणूक लढवतील फक्त नाव त्यांच्या बायकोचं लावतील. महिला आरक्षण जाहीर झाल्यापासून हीच परिस्थिती आहे. सरपंच पती, जिल्हा परिषद पती अशा असंविधानिक शब्दांचा जन्म ह्या व्यवस्थेतून झाला. म्हणजे आरक्षण आहे म्हणून नाव बायकोचं पण निवडणूक लढवणारे, निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण करणारे, आणि निवडून आल्यावर कारभार हाकणारे पुरुषच असतात. (काही अपवाद वगळता) मग खरच ह्या महिला आरक्षणाला काही अर्थ राहतो का?  महीला अनेक वर्ष निवडणुकीच्या प्रक्रियेपासून लांब होत्या. म्हणून ...

भोजे येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न..

Image
 मुख्य संपादक:-दिपक मुलमुले भोजे येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपणचा  कार्यक्रम संपन्न.. दिनांक 27/07/2022 रोजी श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोजे ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळ मिळून  वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाचे  आयोजित करण्यात आले होते.या वेळी 500 विविध जातीची वृक्ष लागवड करण्यात आली. आपल्या सभोवतालच्या परिसरात आपल्याला भविष्यासाठी झाडे लावायची गरज सध्या सगळी कडेच आहे पर्यावरणाचा समतोल साधला तरच जीवन सावरले जाईल पर्यावरण जपणे,निसर्ग जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.या नुसार भोजे येथील तरुणांनी वृक्ष लागवड केली आहे तसेच भोजे येथील तरुण मंडळी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.मागील काळात भोजे येथील तरुणांनी स्मशान भूमी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन व्यवथित रित्या करीत आहे. भोजे ग्रामपंचायत व तरुण मित्र मंडळ यांच्या सहकार्याने भोजे गावासाठी  500 झाडे  मिळाली होती . त्यासाठी तरूण व ग्रामस्थांची वृक्षारोपण आणि संगोपनाची  जबाबदारी घेतली व ती काटे...

भोजे येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न..

Image
 मुख्य संपादक:-दिपक मुलमुले भोजे येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपणचा  कार्यक्रम संपन्न.. दिनांक 27/07/2022 रोजी श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोजे ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळ मिळून  वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाचे  आयोजित करण्यात आले होते.या वेळी 500 विविध जातीची वृक्ष लागवड करण्यात आली. आपल्या सभोवतालच्या परिसरात आपल्याला भविष्यासाठी झाडे लावायची गरज सध्या सगळी कडेच आहे पर्यावरणाचा समतोल साधला तरच जीवन सावरले जाईल पर्यावरण जपणे,निसर्ग जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.या नुसार भोजे येथील तरुणांनी वृक्ष लागवड केली आहे तसेच भोजे येथील तरुण मंडळी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.मागील काळात भोजे येथील तरुणांनी स्मशान भूमी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन व्यवथित रित्या करीत आहे. भोजे ग्रामपंचायत व तरुण मित्र मंडळ यांच्या सहकार्याने भोजे गावासाठी  500 झाडे  मिळाली होती . त्यासाठी तरूण व ग्रामस्थांची वृक्षारोपण आणि संगोपनाची  जबाबदारी घेतली व ती काटे...

रोटरी जळगांव राॅयल्सच्या अध्यक्षपदी विजय लाठी तर मानद सचिवपदी जितेंद्र भोजवानी

Image
रोटरी जळगांव राॅयल्सच्या अध्यक्षपदी विजय लाठी तर मानद सचिवपदी जितेंद्र भोजवानी,                     श्री.विजय लाठी जळगांव : प्रतिनिधी,       स्थापनेपासुनच विविध सामाजिक कार्यात तत्पर असलेल्या व त्याच वर्षी रोटरी डिस्ट्रिक्ट कडुन बेस्ट क्लब म्हणुन गौरवांकीत झालेल्या रोटरी जळगांव राॅयल्सच्या अध्यक्षपदी विजय लाठी तर मानद सचिवपदी जितेंद्र भोजवानी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.                 श्री.जितेंद्र भोजवानी    शनिवार दि ३० जुलै रोजी रोटरी भवन मायादेवी नगर येथे पदग्रहण सोहळ्याचे आयोजन सायंकाळी सात वाजता करण्यात आले असुन यावेळी रोटरी इंटरनेशनल चे मेजर गिफ्ट एडवाइज़र माजी प्रांतपाल राजीव शर्मा तसेच सहाय्यक प्रांतपाल दिलीप गांधी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी नुतन संचालक व सभासदांची देखील घोषणा केली जाईल.    विजय लाठी हे कापड व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्राशी देखिल निगडीत असुन रावसाहेब रूपचंद लाठी यांचे नातु आहेत. तर जितेंद्र ...

माजी उपसभापती पंचायत समिती पाचोरा सौ.रत्नप्रभाअशोक पाटील ह्या पिंपळगांव -भोजे गटातून भाजपा तर्फे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी हालचाली सुरु...

Image
 मुख्य  संपादक-दिपक मुलमुले माजी उपसभापती पंचायत समिती पाचोरा सौ.रत्नप्रभाअशोक पाटील ह्या पिंपळगांव -भोजे गटातून भाजपा तर्फे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी हालचाली सुरु...  दिनांक २८ जुलै गुरुवार रोजी जिल्यातील गटांचे राजकीय आरक्षण जाहीर झाल्याने ज्या, त्या गटातील इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. पिंपळगाव हरेश्वर - भोजे जिल्हापरिषद गट हा सर्व साधारण महिला राखीव झाल्याने या गटामध्ये पिंपळगाव हरेश्वर येथील पाचोरा पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. रत्नप्रभा अशोक पाटील ह्या भाजपा पक्षांतर्फे पिंपळगाव हरेश्र्वर-भोजे -वरखेडी जिल्हापरिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असून त्यांनी या गटासाठी मोर्चे बांधणी सुरु केली असून भाजपा कडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच सौ. रत्नप्रभा अशोक पाटील ह्या पाचोरा पंचायत समितीच्या उपसभापती पदी असतांनाच त्यांनी बरीचशी जनहितार्थ कामे केली आहेत. तसेच त्यांना मूलभूत प्रश्नांची जाण असल्याने पिंपळगाव, वरखेडी गटात सामाजिक, राजकीय कामात त्या सतत सक्रीय असल्याकारणाने त्यांच्या सोबत बराच मोठा कार...

जिल्हा परिषद निवडणुकीत सौ.लता मधुकर पाटील (काटे) पिंपळगांव,भोजे गटातून भाजपा तर्फे प्रबळ दावेदार...

Image
 मुख्य संपादक - दिपक मुलमुले जिल्हा परिषद निवडणुकीत सौ.लता मधुकर पाटील (काटे)  पिंपळगांव-भोजे गटातून भाजपा तर्फे प्रबळ दावेदार... पिंपऴगाव - भोजे जिल्हा परीषद गटातुन - सर्वसाधारण स्त्री राखीव  आरक्षण निघाले आहे.त्यानुसार पिंपऴगाव-भोजे गटातुन- मधुकर काटे माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा सरचिटणीस भाजपा जळगाव.यांची पत्नी सौ. लता मधुकर काटे  ह्या जिल्हा परीषद निवडणुकीत प्रबऴ दावेदारी ठोकणार आहे. पिंपऴगाव-शिंदाड -भोजे जिल्हा परीषद गटाचा मागील 5  ते 10 सर्वात जास्त विकास कामे माजी जिल्हा परिषद सदस्य मधु भाऊ काटे यांच्या कार्यकाळात झालेले आहे. त्यांनी सर्वांच्या सुखा दुःखात सहभागी होऊन सर्वांना सोबत घेऊन सतत जनते सोबत राहून विकास कामे केलेली आहेत  विकासासाठी - समाजसेवेसाठी सौ. लता मधुकर काटे  यांची पिंपळगाव भोजे गटातून भाजपा तर्फे प्रबळ दावेदारीची चर्चा सर्वदूर जोर धरून आहे.सौ.लता मधुकर काटे ह्या माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप जिल्हा सरचिटणीस, मधुभाऊ काटे यांच्या धर्मपत्नी आहेत व  वडगाव कडे येथील  माजी सरपंच आहेत.यांनी गावात रस्ते, गटारी, पेव्हर ब्ल...

सावता महाराज पुण्यतिथी निमित्त पिंपळगाव येथे कार्यक्रम संपन्न..

Image
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले  सावता महाराज पुण्यतिथी निमित्त पिंपळगाव येथे कार्यक्रम संपन्न पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा-  पिंपळगाव हरेश्वर येथे श्री संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त माळी गल्लीतून  आठवडे बाजार मार्गे माळी मंगल कार्यालयापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. माळी मंगल कार्यालयात श्री संत सावता माळी यांच्या फोटोचे पूजन माजी आमदार दिलीप वाघ,उपसरपंच सुखदेव गीते, शालिग्राम मालकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रमोद क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या वेळी सुमित किशोरआप्पा पाटील, कैलास क्षीरसागर,जि.प.सदस्य मधुकर काटे, देविदास महाजन, रवींद्र माळी, कोमलसिंग देशमुख, राहुल बडगुजर, राजू माळी, अर्जुन जाधव सर, सुरेश मालकर, अशोक माळी, कडूबा क्षीरसागर, शशिकांत मालकर, मौजूलाल जैन, अर्जुन मालकर, राजू गीते, दगडू उबाळे, कडूबा गोरे, शिवदास माळी, कुसुमबाई मालकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रलंबित अर्जांची होणार निर्गती...किसान सन्मान योजना...स्वातंत्र्य दिनी होणार नवीन व निर्गती झालेल्या लाभार्थ्यांचे चावडी वाचन.......

Image
  सोयगाव प्रतिनिधी :- प्रलंबित अर्जांची होणार निर्गती...किसान सन्मान योजना...स्वातंत्र्य दिनी होणार नवीन व निर्गती झालेल्या लाभार्थ्यांचे चावडी वाचन.......  सोयगाव,दि.२३...केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता २०१९ मध्ये किसान सन्मान योजना कार्यान्वित करण्यात आली होती,परंतु या योजनेतील शेतकऱ्यांच्या त्रुटी अद्यापही दूर झालेल्या नसून या त्रुटी दूर करण्यासाठी व प्रलंबित अर्जांची निर्गती करण्यासाठी कृषी,महसूल आणि ग्रामविकास यांच्या त्रिसूत्री पद्धतीने गावनिहाय दि.१० आगस्ट पर्यंत शिबिरे घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी शनिवारी दिले आहे.त्यामुळे आता सन्मान योजनेतील प्रलंबित शेतकऱ्यांच्या अर्जांचा निपटारा होणार असल्याचे माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली आहे.      विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे कि,सन्मान योजनेत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये विविध कारणांनी अथवा अपूर्ण अर्जांमुळे काही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अद्याप पोहचलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे.या लाभार्थ्यांना आणि नव्याने नोंदणी करणाऱ्या लाभार...

गोराडखेडा येथील लोकप्रतिनिधींमार्फत विविध मागण्यांसाठी महावितरणला निवेदन ...

Image
  गोराडखेडा प्रतिनिधी :- गोराडखेडा येथील लोकप्रतिनिधींमार्फत विविध मागण्यांसाठी महावितरणला निवेदन ...           येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत प्रतिनिधींमार्फत अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाचोरा रवींद्र शिरसाठ यांना निवेदन देऊन गावातील वीज समस्येबाबत चर्चा करून मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. यात गोराडखेडा बु येथील नवीन वस्तीतील ट्रान्सफॉर्मर बाबत वेळोवेळी भेडसावणारी समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच गोराडखेडा जिप मराठी शाळेतील क्रीडांगणामध्ये थ्रीफेज एलटी लाईनचे दोन इलेक्ट्रिक पोल असून गतकाळात चारवेळेस तार तुटून खाली पडल्या आहेत. सुदैवाने कोणताही अनर्थ घडलेला नाही. २०५ विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत क्रीडांगणाच्या मधून या तारा गेलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हे एकमेव प्रांगण असून येथेच नियमित विद्यार्थ्यांचा वावर असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणताही  अनर्थ घडू नये यासाठी या पोलचे शिफ्टिंग करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.             यासोबतच मौजे गोराडखेडा वडगाव  शेतशि...

तरुण शेतकऱ्याला ३४ हजाराचा ऑनलाईन गंडा सोयगाव तालुक्यातील घटना.....परराज्यातील टोळके सोयगाव तालुक्यात सक्रीय......

Image
  मुख्य संपादक :- दिपक मुलमुले सोयगाव प्रतिनिधी :- ओ.टी.पी देताच तरुण शेतकऱ्याला ३४ हजाराचा ऑनलाईन गंडा......सोयगाव तालुक्यातील घटना.....परराज्यातील टोळके सोयगाव तालुक्यात सक्रीय......   सोयगाव,दि.२३....तुमचे फोन पे नादुरुस्त आहे त्यामुळे फोन पे दुरुस्त करून घ्या असा सल्ला देत परराज्यातील टोळक्यांनी नांदगावतांड्यातील एका तरुण शेतकऱ्याला ऑनलाईन बँकिंग मध्ये तब्बल ३४ हजार आठशे रु चा गंडा घातला असल्याचा प्रकार शनिवारी नांदगावतांड्यात उघडकीस आल आहे.या प्रकरणी तातडीने शेतकऱ्याने औरंगाबाद गाठून शनिवारी सायबर सेलकडे तक्रार केली आहे.या प्रकारामुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली असून सोयगाव तालुक्यात ऑनलाईन गंडा घालणारी पर राज्यातील टोळके सक्रीय झाले आहे.       जितेश रणसिंग चव्हाण(वय २१) या तरुण शेतकऱ्यांचे फोन पे अप्स होते,शेतीच्या व्यवहारासाठी या अप्स द्वारे शेतकरी जितेश चव्हाण हा बँकिंगचे व्यवहार करत होता.परंतु अचानक जीतेशला उत्तर प्रदेश मधील(कानपूर) मधून एका क्रमांकावरून फोन आला असता,त्यांनी सांगितलेकी आम्ही फोन पे सर्वेक्षण करत आहे तुमचे फोन पे नादुरुस्त झाल्याचे आढळून...

भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक याची 166 जयंती साजरी.

Image
 मुख्य संपादक :- दिपक मुलमुले प्रतिनिधी-भडगाव -23-7-2022... भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक याची 166 जयंती साजरी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज 166 वी जयंती आहे. लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे. नव्या पिढीला कळावे या करता आपण त्याची ओळख ही जयंती पुण्यतिथी निम्मिताने करून देत असतो. आज भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकमान्य टिळक याची 166 वी जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक अजबसिहं राजपूत याच्या हस्ते लोकमन्या बाळगंगाधर टिळक याच्या फोटोला माल्यर्पण व पुष्पर्पण करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी टिळक यांचवार भाषणे दिली. त्याचा विषयी माहिती सांगितली व स्वतंत्र लढा, आणि केसरी, मराठा सार्वजनिक उत्सव, शिवजयंती, गा गणेश उत्सव अनेक कार्य त्यांनी केले. हे सांगण्यात आले नव्या पिढीला कळावे व आपल्या साठी आपल्या स्वतंत्र्या साठी, व आपण जे उत्सव साजरे करतो ते का ह्याची ओळख आज करून दिली.त्या आशा महान...

पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवाशी ज्ञानेश्वर ढाकरे यांच्या निमखेडी शिवारातून मोटारसायकल चोरी प्रकरणी जरंडीतून एकास अटक.......

Image
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 9595470800 पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवाशी ज्ञानेश्वर ढाकरे यांच्या  निमखेडी शिवारातून मोटारसायकल चोरी प्रकरणी जरंडीतून एकास अटक.......   सोयगाव,दि.२२...पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवाशी ज्ञानेश्वर ढाकरे यांची मोटार सायकल निमखेडी ता.सोयगाव शिवारातून उभी असलेली मोटारसायकल चोरी झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती.या प्रकरणी शेतकऱ्याने सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.परंतु नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी गतीने तपासचक्रे फिरवून गुरुवारी रात्री जरंडी गावातून एकास संशयावरून ताब्यात घेवून त्यास शुक्रवारी अटक केली.त्यास शुक्रवारी सोयगाव न्यायालयासमोर हजर केले असता,त्यास सोमवार पर्यंत चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.     तेजराव मधुकर पाटील(वय १९)रा.जरंडी ता.सोयगाव असे मोटारसायकल चोरी प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.निमखेडी शिवारातून चोरी झालेल्या मोटारसायकल क्र-एम-एच-१९,बी.के-६५१९ क्रमांकाची मोटारसायकल चोरी झाली होती.त्या...

अज्ञात वाहनाच्या धडकेत कुऱ्हाड येथील मूकबधीर दुचाकीस्वार तरुण जागीच ठार..

Image
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले  अज्ञात वाहनाच्या धडकेत कुऱ्हाड येथील मूकबधीर दुचाकीस्वार तरुण जागीच ठार.. कुऱ्हाड प्रतिनिधी सुनील लोहार... कुऱ्हाड खुर्द येथील रहिवाशी तरुण अनिल माधव चौधरी वय ३१याचे काल सायंकाळी सहा वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेने जळगाव पाचोरा महामार्गावर नंद्रा गावाजवळ अपघाती निधन झाले. मयत अनिल हा काल संध्याकाळी जळगाव येथे दुचाकीवर जात असताना नांद्रा गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला त्याच्या निधनाने कुऱ्हाड गावावर शोककळा पसरली. मयत अनिल  हा अत्यंत गरीबीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील असल्याने त्याचा परिवार आजच उघड्यावर  आलेला आहे. अनिल हा मूकबधिर असल्याने शिलाई  (टेलर )कामात हुशार व्यक्तिमत्व म्हणून पंचक्रोशीत परिचित होता. तसेच तो व्यंगचित्रकार देखील होता . काल त्याच्या अपघाताची बातमी धडकताच कुऱ्हाड  येथील भाजप गन प्रमुख जगदीश तेली ,सरपंच कैलास भगत, शेतकरी सेनेचे अरुण भाऊ पाटील , पत्रकार सुनील लोहार, उपसरपंच अशोक देशमुख दिगंबर चौधरी, कैलास चव्हाण ,अनिल चे दोघे भाऊ आदींनी पाचोरा येथे खाजगी व सरकारी दवाखान्यात...

विजेच्या झटक्याने शिंदाड येथील शेतकऱ्याचा मृत्यू...

Image
मुख्य संपादक:- दिपक मुलमुले  विजेच्या झटक्याने शिंदाड येथील शेतकऱ्याचा मृत्यू... तालुक्यातील शिंदाड येथील शेतकऱ्याचा शेतात असलेल्या विजेच्या खांबाचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, “तालुक्यातील शिंदाड येथील शेतकरी संजय दगा पाटील (वय – ४५) हे आज बुधवार, दि. २० जुलै रोजी शेतातील कपाशी पिकाला फवारणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास संजय पाटील हे फवारणी करत असतांना शेतात असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी संजय पाटील यांना मृत घोषित केले.” घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत संजय पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असुन अतिशय मनमिळाऊ व ह...

पतीला वाचवण्यासाठी नियतीला ही आपला डाव बदलण्यास भाग पाडले; दिले आपल्या पतीला जीवदान...

Image
 पतीला वाचवण्यासाठी नियतीला ही आपला डाव बदलण्यास भाग पाडले; दिले आपल्या पतीला जीवदान... कजगाव ता भडगाव सतीने आपल्या पतीला वाचवण्यासाठी नियतीला ही आपला डाव बदलण्यास भाग पाडले होते अशी आख्यायिका सांगितली जाते स्त्री ही जगतजननी संबोधली जाते स्त्रीने ठरवले तर ती कोणत्याच कामात मागे नाही जर आपल्या कुटुंबावर काही आघात होणार असेलतर हीच स्त्री आपला प्राणही पणाला लावू शकते असेच काहीसे घडले आहे कजगाव जि प शाळेतील शिक्षक कोमलसिंग धर्मा पाटील हे किडनीच्या दुर्धर आजाराने त्रस्त होते डॉक्टरांनी त्यांना किडनी ट्रान्स्फर करण्याचा सल्ला दिला मात्र किडनी देणार कोण? हा प्रश्न पुढे आला अनेक ठिकाणी प्रयत्न केला मात्र किडनी दान करण्यासाठी अनेकांनी असमर्थता दाखवली त्यात किडनी ट्रान्सफर करणे फार अवघड व किचकट प्रक्रिया मानली जाते मात्र अश्यातच पत्नी पुढें येते आणि आपल्या पतीला वाचवण्यात यशस्वी ही झाली आणि खरी रणरागिणी ठरली  ही सिनेमाची कहाणी वाटावी अशीच आहे शिक्षक कोमलसिंग पाटील व ऐश्वर्या कोमलसिंग पाटील हे दाम्पत्य कजगाव जि प शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत मात्र गेल्या दोन वर्षांपासून ऐ...

निधन वार्ता:- पिंपळगाव हरेश्वर येथील माजी सैनिक दगडू शेनफडू सपकाळे यांचे निधन

Image
निधन वार्ता:- पिंपळगाव हरेश्वर येथील माजी सैनिक दगडू शेनफडू सपकाळे यांचे आज रोजी दि 19 जुलै दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने मुंबई येथे आर्मी हॉस्पिटल मध्ये निधन झाले.... त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 20.जुलै रोजी राहील.. अंत्यविधीची  वेळ कळविण्यात येईल.... 

वरसाडे तांडा येथे वाटर फिल्टर चे उदघाटन संपन्न...

Image
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले  वरसाडे तांडा येथे वाटर फिल्टर चे उदघाटन संपन्न...  वरसाडे येथील सरपंच, सदस्य, व ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या मागणी वरून वरसाडे येथे माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा अशोकराव पाटील यांच्या प्रयत्नातून तीन लक्ष पंचवीस हजाराचे वाटर फिल्टर चा प्लांट बसविण्यात आला आहे. याचे उदघाटन सरपंच  लिलाबाई शिवदास राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच येणाऱ्या उन्हाळ्या पर्यंत तिथे थंडगार पाणी मिळेल या साठी तिथे तशी यंत्रणा बसविण्यात येणार आहे असे या वेळी सांगितले.  वरसाडे येथे दूषित पाण्यामुळे रोगराई व पोटाचे विकार वाढले होते त्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून वाटर फिल्टर बसविण्यात आले. आहे  यावेळी डॉ. शांतीलाल जी.तेली भाजपचे परेश पाटील.  सरपंच लिलाबाई शिवदास राठोड.उपसरपंच  बाबुलाल आनंदा चव्हाण.सदस्य बद्रीनाथ बना चव्हान.डॉ.नितीन वर्जन चव्हाण.ज्ञानेश्वर बद्री चव्हाण.विनायक सोमा राठोड.विठ्ठल दारासिंग राठोड.गोकुळ साईदास राठोड.ज्ञानेश्वर राठोड.रंगलाल गोविंदा राठोड.परशुराम सीताराम पवार व गावातील नागरिक उपस्तित होते.. 

मुख्यालयी न राहणारे वैद्यकीय अधिकारी रडारवर; लोहारा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अहवालानंतर कारवाई : सीईओ

Image
मुख्य संपादक :-दिपक मुलमुले.. मुख्यालयी न राहणारे वैद्यकीय अधिकारी रडारवर; लोहारा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अहवालानंतर कारवाई : सीईओ जळगाव : पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने एका महिलेची प्रसुती आरोग्य सेविकेच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यात नवजात शिशू दगावल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी चौकशीसाठी पाठविण्यात आले. अहवाल आल्यानंतर तडकाफडकी संबधीत वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियुक्त करण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी राहत नसल्याने अनेक तक्रारी असल्याने याबाबत आता प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आले असुन अपडाऊन करणारे वैद्यकीय अधिकारी आता रडारवर असल्याची माहीती सीईओ डॉ. आशिया यांनी दिली आहे. लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसतांना एक महिलेची प्रसुती झाली. ४ किलो वजनाचे बाळ जन्मले. नवजात बालकाची प्र...

वडगाव येथील प्रा.कमलाकर इंगळे यांना पीएचडी प्रधान

Image
 विनोद काटे:-  वडगाव प्रतिनिधी... वडगाव येथील प्रा.कमलाकर इंगळे यांना पीएचडी प्रधान    पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एम.एम. महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ.कमलाकर शरद इंगळे यांना मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पी.एचडी.पदवी प्रदान केली आहे. प्रा.डाॅ. कमलाकर इंगळे खानदेश आणि मराठवाड्याच्या सरहद्दीवर वसलेल्या अगदी छोट्याशा गावात अर्थात अजिंठा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या वडगाव गावात जन्म झाला आहे. छोट्याशा गावात राहून सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतली. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करतांना त्यांना बऱ्याचवेळा आर्थिक अडचणी आल्यात. पण त्यावर मात करून त्यांनी यश संपादन केले. चेअरमन संजय वाघ यांच्या सहकार्याने पाचोरा एम.एम. महाविद्यालयात नोकरी मिळवली.      या यशाबद्दल पिटीसी अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानदसचीव महेश देशमुख, व्हा. चेअरमन व्ही.टी.जोशी, पिटीसी संचालक प्रा.भागवत महालपूरे, प्रकाश एकनाथ पाटील, माजी जि प सदस्य मधुकर काटे, प्राचार्य संजय पाटील, मुख्या...

इंदोर- अमळनेर बस अपघातात १३ च्या वर मृतदेह नदीतून काढण्यात आले;दहा मृतदेहांची ओळख पटली..

Image
मुख्य संपादक दिपक मुलमुले  इंदोर- अमळनेर बस अपघातात १३ च्या वर मृतदेह नदीतून काढण्यात आले; दहा मृतदेहांची ओळख पटली जळगाव ,दि.१८: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे.     एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार 1.चेतन चे वडील राम गोपाल जांगिड़ निवासी नांगल कला गोविंदगढ़ जयपुर राजस्थान,2.जगन्नाथ यांचे वडील हेमराज जोशी उम्र 70 वर्ष निवासी मल्हारगढ़ उदयपुर राजस्थान,3.प्रकाश यांचे वडील श्रवण चौधरी वय 40 वर्षे निवासी शारदा कॉलोनी अमलनेर जलगांव महाराष्ट्र,4.नीबाजी यांचे वडील आनंदा पाटिल उम्र 60 साल निवासी पीलोदा अमलनेरगां,5. कमला भाई पति नीबाजी पाटिल वय 55 वर्षे राहणार सी पिलोदा अमलनेर जळगांव,6.चंद्रकांत यांचे वडील एकनाथ पाटील वय 45 वर्षे राहणार अमलनेर जलगांव (उपरोक्त 1 से 6 पर्यंत के मृतकाची ओळख आधार कार्ड व्द...

पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन शाबीत केस निकाल..

Image
मुख्य संपादक दिपक मुलमुले  पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन शाबीत केस निकाल...   दिनांक,,13/7/2022रोजी मा,कोर्ट क्र 1,जि, बि, औधकर यांचे न्यायालयाने कोर्ट केस क्रं, 167/2014 पिंपळगाव (हरे)पोलीस स्टेशनगु,र,न,नंबर, 07/2014 ,,कलम,143,147, 148,149,323,504,506,34 या केस मध्ये कन्वेषण झालेले आहे 13 तारखेला निकाल लागलेला आहे याच्यात एकूण तीन आरोपी आहेत प्रत्येकी  पाच हजार रुपये दंड असे एकूण पंधरा हजार रुपये दंड झालेला आहे या  मधील आरोपी 1)संभाजी सांडू तडवी 2) अशोक दगडू तडवी 3)रहमताबाई संभाजी तडवी याना  प्रत्येकी 5000 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली व चागल्या वागणुकीचा बॉण्ड वर जामीन मंजूर करण्यात आला सरकार पक्षा तर्फे,सरकारी अभियोक्ता म्हणून रमेश खंडू माने यांनी काम पाहिले,,पिंपळगाव पोलीस स्टेशन सहाय्य्क पोलीस निरीक्षक , महेंद्र वाघमारे यांचे मार्गदर्शना खाली पैरवी म्हणून Asi,,491,प्रदिप मुरलीधर पाटील,,केस वॉच,,म्हणून,पो,ना,1234,राजेंद्र धर्मराज पाटिल यांनी काम पाहिले.

लोहारा डॉ.पंडित विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा

Image
दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) लोहारा  डॉ.पंडित विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा  धी शेंदुर्णी सेकं एज्यु. को-ऑप सोसा. द्वारा संचलित डॉ. जे.जी.पंडित मा. विद्यालय .लोहारा, ता. पाचोरा आज विद्यालयात दि 17 -7- 2022  रविवार रोजी संस्थेचा 78 वा संस्था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी  सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. एस .आर. माने होते. अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते  कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुतळ्याचे  पूजन करण्यात आले. त्यानंतर  स्वागत गीताने  कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास रामेश्वरतांडा येथील माजी पोलीस पाटील व दानशूर व्यक्तिमत्त्व श्री. मंदोर नाईक , युवा सरपंच दत्तू राठोड ,पद्माकर राठोड ,गोविंद राठोड ,लोहारा येथील मा. सरपंच डॉ बाळू जैन,  विविध कार्यकारी सोसायटी विद्यमान चेअरमन शरद सोनार ,मा.मुख्याध्यापक अ. अ.पटेल  ,सेवानिवृत्त शिक्षक पी. व्ही .जोशी ,ज्येष्ठ नागरिक उत्तमराव शेळके,  कैलास चौधरी,ज्ञानेश्वर जाध...

रेल्वेखाली चिरडून एका ४९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू.

Image
 मुख्य संपादक दिपक मुलमुले 9595470800 रेल्वेखाली चिरडून  एका ४९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू. आपल्या नणंदेच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम उरकुन पुण्याहुन पाचोरा येथे महाराष्ट्र एक्सप्रेसने परतलेल्या पाचोरा येथील एका ४९ वर्षीय महिलेचा राजधानी एक्सप्रेसखाली सापडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक १७ जुलै रविवार रोजी सकाळी ६:५० वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील मुळचे रहिवासी व हल्ली मुक्काम पाचोरा शहरातील भडगाव रोड स्वामी लॉन्स परिसरातील रहिवासी सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी सुरेश पाटील यांच्या पत्नी सुनिता सुरेश पाटील ह्या चार दिवसांपूर्वी आपल्या तीन जावांसह पुणे येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या नणंदेच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. दरम्यान ओटी भरण्याचा कार्यक्रम उरकुन दिनांक १६ जुलै शनिवार रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कोल्हापूरहुन गोंदिया कडे जाणाऱ्या डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेस (क्रंमाक ११०३९) ने पाचोरा येण्यासाठी निघाल्या होत्...

पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपन व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न...

Image
मुख्य संपादक दिपक मुलमुले 9595470800 पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपन व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न... दि.16 जुलै रोजी सकाळी 10 वाजेला पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.निसर्गावरील अतिक्रमणामुळे निसर्गचक्र बिघडले आहे. त्यामुळेच कधी अतिवृष्टी, कधी कोरडा दुष्काळ, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निसर्गाची जपणूक करणे आणि हरित सुंदर करणे यासह वृक्षसंवर्धनाचा   जगविण्याचा निर्धार केला. झाडे लावण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. निंब, अशोक वृक्ष, वड,पिंपळ, गुलमोहर, आंबा, चिंच,आवळा,नारळ,अशा विविध जातीची 80 च्यावर रोपांची लागवड पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे  करण्यात आली.   त्याच बरोबर जनता  जनता दरबाराचे आयोजन करण्यात आहे होते,जनता दरबारात आज पेंडिंग असलेल्या केसेस व अर्जाचा निपटारा करण्यात आला.आणि पिंपळगाव हरेश्वर येथील नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशी यात्रा निमित्त ज्यांनी ज्यांनी पोलीस प्रशासनास स्वयंसेवक म्हणून मदत केली अशा सर्व जणांचा सत्कार करण्यात आला.या मध्...

पिंपळगाव हरे येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्ष व ग्रंथ दिंडी उत्साहात साजरी..

Image
पिंपळगाव हरे येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्ष व ग्रंथ दिंडी उत्साहात साजरी.. पिंपळगाव हरे येथील श्रद्धा इंग्लिश मिडीयम स्कूल ता -पाचोरा यांनी येथील शाळेच्या विध्यार्त्यांनी शाळे पासून ते प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेले पिंपळगाव हरेश्वर येथील श्री समर्थ गोविंद महाराज मंदिर पर्यत पायी दिंडी काढली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई, व वेगवेगळे संत व वारकरी यांची वेशभूषा स्वीकारली. या दिंडीत विध्यार्थ्यानी विठ्ठल भक्तीत विलीन होऊन पायी दिंडीचा आनंद लुटला. मंदिरात दिंडी पोहचल्या नंतर सर्वानी श्री समर्थ गोविंद महाराज यांचे दर्शन घेतले व आषाढी एकादशी याचे महत्व समजून घेतले. मंदिरात सत्यम शिवम सुंदरम प्रार्थना म्हटली श्री गोविंद महाराज मंदिर संस्थान यांच्या वतीने शाळेचे अध्यक्ष भीक नत्थू चौधरी यांचा व शाळेच्या संचालिका ज्योती चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षिका व गाडी ड्रायव्हर बंधू उपस्थित होते. 

खाजगी प्राथमिक विद्यामंदिर पिंपळगाव हरे येथील चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्त काढली पायी दिंडी..

Image
मुख्य संपादक दिपक मुलमुले 9595470800 खाजगी प्राथमिक विद्यामंदिर पिंपळगाव हरे येथील चिमुकल्यांनी  आषाढी एकादशी निमित्त काढली पायी दिंडी.. आषाढी एकादशी निमित्ताने पिंपळगाव हरे येथील प्राथमिक विद्यालयातील चिमुकल्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले व विद्यार्थ्यांनी  गावातील मुख्य रस्त्या वरून पालखी मिरवणूक काढली. यावेळी विठू नामाचा गजर करण्यात आला, गोविंद महाराज कि जय जल्लोषात म्हटले  अशा विठ्ठलमय वातावरणात दिंडी मध्ये रिंगण सोहळा रंगला.यात वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते  कोरोनाच्या दोन वर्षानंतर  मंगळवार दि 12.रोजी  आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सजावट करून त्या मध्ये विठूरायाची प्रतिमा व ग्रंथ ठेवण्यात आले होते.लहान मुलांनी वेगळंवेगळ्य वेष भूशा परिधान करून आकर्षित ठरले. वारकरी बनून विठ्ठल विठ्ठल जय विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे पोशाख घोष करीत सहभागी झाले होते. परि...

पिंपळगाव हरे येथील खाजगी प्राथमिक विद्यामंदिर येथील शिक्षकांची महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर महासंघ मध्ये निवड...

Image
दिपक मुलमुले 9595470800 पिंपळगाव हरे येथील खाजगी प्राथमिक विद्यामंदिर येथील शिक्षकांची महाराष्ट्र राज्य  शिक्षक-शिक्षकेतर महासंघ मध्ये निवड... महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघ शाखा-पाचोरा येथे नुकत्याच जाहीर झालेल्या नूतन तालुका कार्यकारणीत खाजगी प्राथमिक विद्या मंदिर येथील शिक्षक श्री प्रशांत चौधरी सर यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच श्री प्रशांत पाटील सर यांची व श्रीमती नंदिनी वाघ मॅडम यांची कार्यकारिणीत सदस्यपदी निवड करण्यात आली... त्याबद्दल या शिक्षकांचा शाळेच्या वतीने खाजगी प्राथमिक विद्या मंदिर पिंपळगाव  हरे येथील  मुख्याध्यापक श्री शशिकांत महालपुरे सर, उपमुख्याध्यापक श्री प्रमोद मस्कावदे सर, उपशिक्षिका श्रीमती मीना मोरे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला...यावेळी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते...

पिंपळगांव हरेश्वर येथे कृपाराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला...

Image
दिपक मुलमुले ९५९५४७०८००   पिंपळगांव हरेश्वर येथे कृपाराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला...   पिंपळगांव हरेश्वर येथे दिनांक १३ जुलै २०२२ रोजी श्री गणेश व प.पु.सद्गुरु डॉ.श्री रामचंद्र महाराज पारनेरकर ह्यांच्या कृपाराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव  मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी मंदिरांचे पुजारी वे.मु.चि.विवेकानंद शरद कापसे यांच्या वेदमंत्रांच्या घोषात श्री.ॲड. अरुण नारायण कुलकर्णी ( सपत्नीक ) यांच्या हस्ते मुर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचार पुजन करण्यात आले. तसेच ११.०० वा.पूर्णवादी शिक्षक श्री.सुधीर जी दाणेकर ( आमठाणा ) यांचे पूर्णवादी तत्वज्ञानावर व्याख्यान झाले. तसेच दुपारी १२.०० वा.महाआरती करण्यात आली.ह्या प्रसंगी ऍड.अरुण नारायण कुळकर्णी,श्री.तुषार शरद कापसे, श्री.मुकेश चौधरी,श्री.शैलेश दाणेकर (आमठाणा ) वे.मु.विवेकानंद शरद कापसे,चि.प्रसाद मनोज साखरे,सौ.रंजना कुलकर्णी,सौ.सुशिला कापसे,व श्रीमती वंदना काळे वगैरे उपस्थित होते तसेच सर्वांसाठी तिर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

आषाढी एकादशी निमित्त शीतल आर्ट क्लासेस च्या विधार्थिनीनी विठू माऊली ची ५×६ फुट ची भव्य रांगोळी साकारली.

Image
 दिपक मुलमुले ९५९५४७०८०० आषाढी एकादशी निमित्त साकारली विठूरायाची रांगोळी ... आषाढी एकादशी निमित्त शीतल आर्ट क्लासेस च्या विधार्थिनीनी विठू माऊली ची ५×६ फुट ची भव्य रांगोळी साकारली.  पाचोरा येथील शीतल आर्ट च्या क्लासेस मधील विद्यार्थिनींनी भव्य अशी रांगोळी शीतल आर्ट च्या संचालिका शीतल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खाली साकारली.या रांगोळी साठी तब्बल तीन ते चार दिवस परिश्रम घेऊन विद्यार्थिनींनी विठूरायाची अप्रतिम रांगोळी साकारली.या रांगोळी मध्ये शीतल पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल आर्ट क्लासेस च्या विद्यार्थिनी रिया महाजन ,मयुरि पवार,अनुष्का पाटील,नयना गुजर ,प्रांजल पाटील,योगिता पाटील ,साक्षी पाटील या विद्यार्थिनीनि अथक परिश्रम घेतले. देव अमुचा भोळा | त्यासी भक्तीचा लळा |आषाढीची वारी | एक आनंद सोहळा ||..विठूमाऊली शीतल आर्ट क्लासेस**  एल/,57 बेसमेंट नवकार प्लाझा, कृषी उत्पन्न बाजार समिती समोर,जुना  भडगाव रोड  पाचोरा नं:8766962911,9420221865

भुसावळ मंडळ सल्लागार समितीची 168 वी बैठक संपन्न - पाचोरा स्टेशन वरील समस्यांचा दिलीप पाटील यांनी वाचला पाढा,

Image
 दिपक मुलमुले ९५९५४७०८०० भुसावळ मंडळ सल्लागार समितीची 168 वी बैठक संपन्न - पाचोरा स्टेशन वरील समस्यांचा दिलीप पाटील यांनी वाचला पाढा,     आज दिनांक १४ जुलै रोजी भुसावळ मंडळ येथे भुसावळ मंडळातील सल्लागार सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यामध्ये प्रत्येक सदस्यांतर्फे रेल्वे स्टेशनवरील समस्या, सूचना  भुसावळ मंडळाचे मंडळ रेल प्रबंधक एस. एस. केडिया व ईतर अधिकारी यांसमोर मांडल्या गेल्यात, केडिया यांनी सर्व समस्या ऐकूण घेत त्या लवकरच सुटतील असे लेखी स्वरूपातील सूचनांचे उत्तर सर्वच सदस्यांना लेखी स्वरूपात देण्यात आले, यावेळी सर्वच १४ सदस्यांमधून एका सदस्याची ZRUCC सदस्यासाठी गुप्त चिठ्ठी मतदान पद्धतीने मत घेण्यात आली, यात वसंत बाच्छुका, अकोला यांची ZRUCC म्हणून निवड करण्यात आली, {भुसावळ मंडळातील पाचोरा येथील दिलीप पाटील यांनी पाचोरा स्टेशन वरील समस्यांचा सूचना देत ईतर समस्यांचा पाढा वाचला यात मुख्यत्वे इगतपूरी भुसावळ मेमू ट्रेन सकाळी नाशिक, चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, अशी सूरू व्हावी, पाचोरा जंक्शन वर स्यांचलित जिना एस्केलेटर, स्टील रेलिंग, कोच पोजिशन इंडिकेटर, कोच पोज...