पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवाशी ज्ञानेश्वर ढाकरे यांच्या निमखेडी शिवारातून मोटारसायकल चोरी प्रकरणी जरंडीतून एकास अटक.......
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 9595470800
पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवाशी ज्ञानेश्वर ढाकरे यांच्या निमखेडी शिवारातून मोटारसायकल चोरी प्रकरणी जरंडीतून एकास अटक.......
सोयगाव,दि.२२...पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवाशी ज्ञानेश्वर ढाकरे यांची मोटार सायकल निमखेडी ता.सोयगाव शिवारातून उभी असलेली मोटारसायकल चोरी झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती.या प्रकरणी शेतकऱ्याने सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.परंतु नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी गतीने तपासचक्रे फिरवून गुरुवारी रात्री जरंडी गावातून एकास संशयावरून ताब्यात घेवून त्यास शुक्रवारी अटक केली.त्यास शुक्रवारी सोयगाव न्यायालयासमोर हजर केले असता,त्यास सोमवार पर्यंत चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
तेजराव मधुकर पाटील(वय १९)रा.जरंडी ता.सोयगाव असे मोटारसायकल चोरी प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.निमखेडी शिवारातून चोरी झालेल्या मोटारसायकल क्र-एम-एच-१९,बी.के-६५१९ क्रमांकाची मोटारसायकल चोरी झाली होती.त्यावरून मोटारसायकल मालक ज्ञानेश्वर मोतीलाल ढाकरे या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी गतिमान तपासचक्रे फिरवून २४ तासातच आरोपीला जेरबंद केले असून त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राजू बर्डे,रवींद्र तायडे,सादिक तडवी,आदि तपास करत आहे.
Comments
Post a Comment