शिंदाड येथे जिल्हा परिषद शाळेला एलईडी टीव्ही सप्रेम भेट.

मुख्य संपादक:-दिपक मुलमुले

शिंदाड येथे जिल्हा परिषद शाळेला एलईडी टीव्ही सप्रेम भेट.



 शिंदाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बँक ऑफ बडोदा यांच्या 115 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 30 जुलै 2022 वार शनिवार रोजी एलईडी टीव्ही सप्रेम भेट देण्यात आला बँक ऑफ बडोदा यांच्या 115 वर्धापन दिनानिमित्त  येथील जिल्हा परिषद शाळेला डिजिटल शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने बँक ऑफ बडोदा तर्फे टीव्ही सप्रेम भेट देण्यात आला यावेळी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ बडोदा मॅनेजर राहुल सर व सर्व स्टाफ होता आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे  सरपंच ज्ञानेश्वर भाऊ तांबे उपसरपंच नरेंद्र बापू शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बोरसे यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले सर्व कर्मचारी  उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व शिक्षक स्टाफ तर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ह्या उपक्रमाने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.