जिल्हा परिषद निवडणुकीत सौ.लता मधुकर पाटील (काटे) पिंपळगांव,भोजे गटातून भाजपा तर्फे प्रबळ दावेदार...

 मुख्य संपादक - दिपक मुलमुले

जिल्हा परिषद निवडणुकीत सौ.लता मधुकर पाटील (काटे)  पिंपळगांव-भोजे गटातून भाजपा तर्फे प्रबळ दावेदार...


पिंपऴगाव - भोजे जिल्हा परीषद गटातुन - सर्वसाधारण स्त्री राखीव  आरक्षण निघाले आहे.त्यानुसार पिंपऴगाव-भोजे गटातुन- मधुकर काटे माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा सरचिटणीस भाजपा जळगाव.यांची पत्नी सौ. लता मधुकर काटे  ह्या जिल्हा परीषद निवडणुकीत प्रबऴ दावेदारी ठोकणार आहे. पिंपऴगाव-शिंदाड -भोजे जिल्हा परीषद गटाचा मागील 5  ते 10 सर्वात जास्त विकास कामे माजी जिल्हा परिषद सदस्य मधु भाऊ काटे यांच्या कार्यकाळात झालेले आहे. त्यांनी सर्वांच्या सुखा दुःखात सहभागी होऊन सर्वांना सोबत घेऊन सतत जनते सोबत राहून विकास कामे केलेली आहेत  विकासासाठी - समाजसेवेसाठी सौ. लता मधुकर काटे  यांची पिंपळगाव भोजे गटातून भाजपा तर्फे प्रबळ दावेदारीची चर्चा सर्वदूर जोर धरून आहे.सौ.लता मधुकर काटे ह्या माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप जिल्हा सरचिटणीस, मधुभाऊ काटे यांच्या धर्मपत्नी आहेत व  वडगाव कडे येथील  माजी सरपंच आहेत.यांनी गावात रस्ते, गटारी, पेव्हर ब्लॉक अशी अनेक कामे केल्याने व अनेक मूलभूत प्रश्नांची जाण असल्याने पिंपळगाव, भोजे  गटात ला त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे तसेच त्याचे पती माजी जिल्हापरिषद सदस्य मधु भाऊ काटे  यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा जण  समूह त्यांच्या सोबत जुडला असल्याने पिंपळगाव-भोजे गटात अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लावलेली आहेत.आणि त्याच्या कामाची सर्वदूर चर्चा हि आहेच. पिंपळगाव-भोजे गटाचा अजून भरभरून विकास व्हावा या साठी सौ. लता मधुकर काटे माजी सरपंच वडगाव कडे  यांना उमेदवारी मिळावी अशी या गटातील कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता मागणी करत असल्याने यंदाच्या निवडणुकीत भाजपा पक्षाकडून उमेदवारी च्या प्रबळ दावेदार त्या आहेत  या साठी.जनतेचा  आग्रही आहेत. असे दिपलक्ष मराठी न्युज सोबत बोलतांना माजी जिल्हापरिषद सदस्य मधु भाऊ काटे व माजी सरपंच वडगाव कडे सौ.लता मधुकर पाटील यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.