तरुण शेतकऱ्याला ३४ हजाराचा ऑनलाईन गंडा सोयगाव तालुक्यातील घटना.....परराज्यातील टोळके सोयगाव तालुक्यात सक्रीय......

  मुख्य संपादक :- दिपक मुलमुले

सोयगाव प्रतिनिधी :-

ओ.टी.पी देताच तरुण शेतकऱ्याला ३४ हजाराचा ऑनलाईन गंडा......सोयगाव तालुक्यातील घटना.....परराज्यातील टोळके सोयगाव तालुक्यात सक्रीय......



  सोयगाव,दि.२३....तुमचे फोन पे नादुरुस्त आहे त्यामुळे फोन पे दुरुस्त करून घ्या असा सल्ला देत परराज्यातील टोळक्यांनी नांदगावतांड्यातील एका तरुण शेतकऱ्याला ऑनलाईन बँकिंग मध्ये तब्बल ३४ हजार आठशे रु चा गंडा घातला असल्याचा प्रकार शनिवारी नांदगावतांड्यात उघडकीस आल आहे.या प्रकरणी तातडीने शेतकऱ्याने औरंगाबाद गाठून शनिवारी सायबर सेलकडे तक्रार केली आहे.या प्रकारामुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली असून सोयगाव तालुक्यात ऑनलाईन गंडा घालणारी पर राज्यातील टोळके सक्रीय झाले आहे.

      जितेश रणसिंग चव्हाण(वय २१) या तरुण शेतकऱ्यांचे फोन पे अप्स होते,शेतीच्या व्यवहारासाठी या अप्स द्वारे शेतकरी जितेश चव्हाण हा बँकिंगचे व्यवहार करत होता.परंतु अचानक जीतेशला उत्तर प्रदेश मधील(कानपूर) मधून एका क्रमांकावरून फोन आला असता,त्यांनी सांगितलेकी आम्ही फोन पे सर्वेक्षण करत आहे तुमचे फोन पे नादुरुस्त झाल्याचे आढळून आले आहे त्यामुळे त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक संदेश पाठवितो तुम्ही ओ.टी.पी पुरवा असे सांगून सदरील शेतकऱ्याने ओ.टी.पी देताच शेतकऱ्याच्या खात्यावरील पहिल्या टप्प्यात चार हजार आठशे,त्यानंतर तीन वेळा दहा हजार असे असे ३४ हजार आठशे रु खात्यावरून अचानक गायब झाल्याने शेतकऱ्याला धडकी बसली आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे कळताच जितेश चव्हाण यांनी सायबर सेल कडे तातडीने शनिवारी तक्रार दाखल केली असता खात्यातील रक्कम हि उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश चं बँकेत वर्ग झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यात ऑनलाईन बँकिंग मध्ये परराज्यातील टोळके सक्रीय झाले असल्याचे उघड झाल्याने सोयगाव तालुक्त्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पुढील तपास सायबर सेल करत आहे.

 सोयगाव तालुक्यात ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन व्यवहार करू नये,तसेच आपल्या खात्याचा ओ.टी.पी ची गोपनीयता बाळगावी,कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास तातडीने सोयगाव पोलीस ठाण्याशी संपर्क करावा आणि गोंधळून जावू नये,ऑनलाईन बँकिंग व्यवहाराची गोपनीयता कोणालाही सांगू नये...    अनमोल केदार सहायक पोलीस निरीक्षक सोयगाव....

सोयगाव तालुक्यात आधुनिक शेतीकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन बँकिंगच्या व्यवहारावर भर दिला आहे त्यामुळे सोयगाव सह तालुक्यात ग्रामीण भागात ऑनलाईन व्यवहार सुरु आहे परंतु ग्रामीण भागाचा फायदा घेत पर राज्यातील टोळक्यांनी आता सोयगाव तालुका टार्गेट केलेला आहे त्यामुळे ऑनलाईन बँकिंग व्यवहार करतांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

परराज्यातील टोळक्यांचा ऑनलाईन चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी सोयगाव पोलीस ठाणे सज्ज झाले असून नव्याने रीजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी या पर राज्यातील टोळक्यांचा तपास घेण्याचे काम हाती घेतले आहे.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.