वडगाव येथील प्रा.कमलाकर इंगळे यांना पीएचडी प्रधान
विनोद काटे:- वडगाव प्रतिनिधी...
वडगाव येथील प्रा.कमलाकर इंगळे यांना पीएचडी प्रधान
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एम.एम. महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ.कमलाकर शरद इंगळे यांना मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पी.एचडी.पदवी प्रदान केली आहे.
प्रा.डाॅ. कमलाकर इंगळे खानदेश आणि मराठवाड्याच्या सरहद्दीवर वसलेल्या अगदी छोट्याशा गावात अर्थात अजिंठा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या वडगाव गावात जन्म झाला आहे. छोट्याशा गावात राहून सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतली. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करतांना त्यांना बऱ्याचवेळा आर्थिक अडचणी आल्यात. पण त्यावर मात करून त्यांनी यश संपादन केले. चेअरमन संजय वाघ यांच्या सहकार्याने पाचोरा एम.एम. महाविद्यालयात नोकरी मिळवली.
या यशाबद्दल पिटीसी अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानदसचीव महेश देशमुख, व्हा. चेअरमन व्ही.टी.जोशी, पिटीसी संचालक प्रा.भागवत महालपूरे, प्रकाश एकनाथ पाटील, माजी जि प सदस्य मधुकर काटे, प्राचार्य संजय पाटील, मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment