प्रलंबित अर्जांची होणार निर्गती...किसान सन्मान योजना...स्वातंत्र्य दिनी होणार नवीन व निर्गती झालेल्या लाभार्थ्यांचे चावडी वाचन.......

  सोयगाव प्रतिनिधी :-

प्रलंबित अर्जांची होणार निर्गती...किसान सन्मान योजना...स्वातंत्र्य दिनी होणार नवीन व निर्गती झालेल्या लाभार्थ्यांचे चावडी वाचन.......



 सोयगाव,दि.२३...केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता २०१९ मध्ये किसान सन्मान योजना कार्यान्वित करण्यात आली होती,परंतु या योजनेतील शेतकऱ्यांच्या त्रुटी अद्यापही दूर झालेल्या नसून या त्रुटी दूर करण्यासाठी व प्रलंबित अर्जांची निर्गती करण्यासाठी कृषी,महसूल आणि ग्रामविकास यांच्या त्रिसूत्री पद्धतीने गावनिहाय दि.१० आगस्ट पर्यंत शिबिरे घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी शनिवारी दिले आहे.त्यामुळे आता सन्मान योजनेतील प्रलंबित शेतकऱ्यांच्या अर्जांचा निपटारा होणार असल्याचे माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली आहे.

     विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे कि,सन्मान योजनेत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये विविध कारणांनी अथवा अपूर्ण अर्जांमुळे काही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अद्याप पोहचलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे.या लाभार्थ्यांना आणि नव्याने नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान करावयाची असल्याने दि .१४ आगस्टच्या मुदतीत या प्रलंबित अर्जांबाबतची कार्यवाही अंतिम करण्याबाबतचं सूचना केंद्राकडून प्राप्त झालेल्या आहे त्यासाठी दि.१० आगस्ट पर्यंत कृषी ,महसूल आणि पंचायत विभाग यांनी संयुक्त गावनिहाय शिबिरे घेवून प्रलंबित अर्जांचा निपटारा करावा तसेच नव्याने नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-----स्वातंत्र्य दिनी होणार लाभार्थ्यांचे चावडी वाचन----

 अपूर्ण अर्जांची निर्गती झालेले आणि नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या नावांचे दि.१५ आगस्ट स्वातंत्र्य दिनी चावडी वाचन करण्यात येणार असून यावेळी कृषी,महसूल आणि पंचायत विभागांनी चावडी वाचन झालेल्या शेतकऱ्यांची सदोष यादी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात अपलोड करण्यात येईल यादी पाठविल्यानंतर नव्याने आणि निर्गती झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

----सन्मान योजना अडकली कृषी आणि महसूलच्या वादात—

 अनेक दिवसापासून कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्यातील वादात हि योजना अडकली होती शेतकरी कृषी विभागात गेल्यावर त्यांना महसूल कडे पाठविण्यात येत होते तर महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे टोलवाटोलवी करण्यात येत होती आता हि टोलवाटोलवी तूर्तास थांबणार आहे.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.