खाजगी प्राथमिक विद्यामंदिर पिंपळगाव हरे येथील चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्त काढली पायी दिंडी..
मुख्य संपादक दिपक मुलमुले 9595470800
खाजगी प्राथमिक विद्यामंदिर पिंपळगाव हरे येथील चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्त काढली पायी दिंडी..
आषाढी एकादशी निमित्ताने पिंपळगाव हरे येथील प्राथमिक विद्यालयातील चिमुकल्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले व विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य रस्त्या वरून पालखी मिरवणूक काढली. यावेळी विठू नामाचा गजर करण्यात आला, गोविंद महाराज कि जय जल्लोषात म्हटले अशा विठ्ठलमय वातावरणात दिंडी मध्ये रिंगण सोहळा रंगला.यात वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कोरोनाच्या दोन वर्षानंतर मंगळवार दि 12.रोजी आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सजावट करून त्या मध्ये विठूरायाची प्रतिमा व ग्रंथ ठेवण्यात आले होते.लहान मुलांनी वेगळंवेगळ्य वेष भूशा परिधान करून आकर्षित ठरले.
वारकरी बनून विठ्ठल विठ्ठल जय विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे पोशाख घोष करीत सहभागी झाले होते. परिधान केले होते. डोळ्यांचे पारणे फेडणारा दिंडी. सोहळा अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला.
यावेळी खाजगी प्राथमिक विद्या मंदिर येथून पालखी सोहळा मिरवणूकिची सुरुवात ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष देविदास महाजन व मुख्याध्यापक शशिकांत महालपुरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीला सुरुवात करण्यात आली.दिंडी गावातून राजे संभाजी चौकातून गणपती मंदिर मार्गे,चामुंडा माता मंदिराकडून,माळी मंगल कार्यलय जवळून श्री समर्थ गोविंद महाराज मंदिरात समारोप करण्यात आला.सर्व चिमुकल्या विध्यार्थ्यांना उपशिक्षक तडवी सर यांनी आषाढी एकादशी चे महत्व विध्यार्थ्यांना पटवून सांगितले तर शाळेतील उपशिक्षिका वाघ मॅडम यांनी प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेले गाव पिंपळगाव हरेश्वर व या गावात श्री समर्थ गोविंद महाराज चरित्र सर्व विध्यार्त्यांना समजून सांगिलते.त्या नंतर सर्वानी गोविंद महाराज मंदिर येथे दर्शन घेतले व तिथे मुलांना प्रसाद म्हणून केळी वाटप करण्यात आली.श्री समर्थ गोविंद महाराज मंदिर संस्थान यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष,चिटणीस,संचालक मंडळाचे त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी विध्यार्थी वर्ग,संस्थेचे अध्यक्ष,चिटणीस,ग्राम विकास विध्यालयाचे मुख्याध्यापक,खाजगी प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका,व शिक्षकेतर कर्मचारी गावातील ग्रामस्थ उपस्तित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षका,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..
Comments
Post a Comment