रोटरी जळगांव राॅयल्सच्या अध्यक्षपदी विजय लाठी तर मानद सचिवपदी जितेंद्र भोजवानी
रोटरी जळगांव राॅयल्सच्या अध्यक्षपदी विजय लाठी तर मानद सचिवपदी जितेंद्र भोजवानी,
श्री.विजय लाठी
जळगांव : प्रतिनिधी,
स्थापनेपासुनच विविध सामाजिक कार्यात तत्पर असलेल्या व त्याच वर्षी रोटरी डिस्ट्रिक्ट कडुन बेस्ट क्लब म्हणुन गौरवांकीत झालेल्या रोटरी जळगांव राॅयल्सच्या अध्यक्षपदी विजय लाठी तर मानद सचिवपदी जितेंद्र भोजवानी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.
श्री.जितेंद्र भोजवानी
शनिवार दि ३० जुलै रोजी रोटरी भवन मायादेवी नगर येथे पदग्रहण सोहळ्याचे आयोजन सायंकाळी सात वाजता करण्यात आले असुन यावेळी रोटरी इंटरनेशनल चे मेजर गिफ्ट एडवाइज़र माजी प्रांतपाल राजीव शर्मा तसेच सहाय्यक प्रांतपाल दिलीप गांधी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी नुतन संचालक व सभासदांची देखील घोषणा केली जाईल.
विजय लाठी हे कापड व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्राशी देखिल निगडीत असुन रावसाहेब रूपचंद लाठी यांचे नातु आहेत. तर जितेंद्र भोजवानी आटोमोबाइल क्षेत्राशी निगडीत आहेत, दोन्ही नुतन पदाधिकारी गेल्या १० वर्षांपासुन रोटरीशी संलग्न असून सामजिक कार्यात सक्रिय आहेत.
Comments
Post a Comment