पिंपळगांव हरेश्वर येथे कृपाराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला...

दिपक मुलमुले ९५९५४७०८००

 पिंपळगांव हरेश्वर येथे कृपाराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला...

 



पिंपळगांव हरेश्वर येथे दिनांक १३ जुलै २०२२ रोजी श्री गणेश व प.पु.सद्गुरु डॉ.श्री रामचंद्र महाराज पारनेरकर ह्यांच्या कृपाराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव  मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.


त्या प्रसंगी मंदिरांचे पुजारी वे.मु.चि.विवेकानंद शरद कापसे यांच्या वेदमंत्रांच्या घोषात श्री.ॲड. अरुण नारायण कुलकर्णी ( सपत्नीक ) यांच्या हस्ते मुर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचार पुजन करण्यात आले.
तसेच ११.०० वा.पूर्णवादी शिक्षक श्री.सुधीर जी दाणेकर ( आमठाणा ) यांचे पूर्णवादी तत्वज्ञानावर व्याख्यान झाले. तसेच दुपारी १२.०० वा.महाआरती करण्यात आली.ह्या प्रसंगी ऍड.अरुण नारायण कुळकर्णी,श्री.तुषार शरद कापसे, श्री.मुकेश चौधरी,श्री.शैलेश दाणेकर (आमठाणा ) वे.मु.विवेकानंद शरद कापसे,चि.प्रसाद मनोज साखरे,सौ.रंजना कुलकर्णी,सौ.सुशिला कापसे,व श्रीमती वंदना काळे वगैरे उपस्थित होते तसेच सर्वांसाठी तिर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.



Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.