गोराडखेडा येथील लोकप्रतिनिधींमार्फत विविध मागण्यांसाठी महावितरणला निवेदन ...

 गोराडखेडा प्रतिनिधी :-

गोराडखेडा येथील लोकप्रतिनिधींमार्फत विविध मागण्यांसाठी महावितरणला निवेदन ...



          येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत प्रतिनिधींमार्फत अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाचोरा रवींद्र शिरसाठ यांना निवेदन देऊन गावातील वीज समस्येबाबत चर्चा करून मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. यात गोराडखेडा बु येथील नवीन वस्तीतील ट्रान्सफॉर्मर बाबत वेळोवेळी भेडसावणारी समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच गोराडखेडा जिप मराठी शाळेतील क्रीडांगणामध्ये थ्रीफेज एलटी लाईनचे दोन इलेक्ट्रिक पोल असून गतकाळात चारवेळेस तार तुटून खाली पडल्या आहेत. सुदैवाने कोणताही अनर्थ घडलेला नाही. २०५ विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत क्रीडांगणाच्या मधून या तारा गेलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हे एकमेव प्रांगण असून येथेच नियमित विद्यार्थ्यांचा वावर असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणताही  अनर्थ घडू नये यासाठी या पोलचे शिफ्टिंग करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.    

        यासोबतच मौजे गोराडखेडा वडगाव  शेतशिवारातील डीपी ओव्हरलोड झाल्याने नवीन शंभर केएव्हीचा थ्री फेज ट्रान्सफॉर्मर डीपीडीसी फंडातून बसविण्यासंबंधी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शिफारशीसह निवेदन देण्यात आले. यासंबंधीचेच मौजे वडगाव बु शेतशिवारातील डीपीही ओव्हरलोड झाल्याने त्या ठिकाणीही डीपीडीसी अंतर्गत शंभर केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्या संबंधाचे निवेदन देण्यात आले. प्रसंगी कॉन्ट्रक्टर तथा गोराडखेडा विका सोसायटीचे सदस्य दिनेश उत्तमराव पाटील, गोराडखेडा उपसरपंच विजय गोपीचंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज रामदास पाटील यांनी उपविभागीय कार्यालयास भेट देऊन साहेबांशी चर्चा करत निवेदन 

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.