पतीला वाचवण्यासाठी नियतीला ही आपला डाव बदलण्यास भाग पाडले; दिले आपल्या पतीला जीवदान...

 पतीला वाचवण्यासाठी नियतीला ही आपला डाव बदलण्यास भाग पाडले; दिले आपल्या पतीला जीवदान...
कजगाव ता भडगाव सतीने आपल्या पतीला वाचवण्यासाठी नियतीला ही आपला डाव बदलण्यास भाग पाडले होते अशी आख्यायिका सांगितली जाते स्त्री ही जगतजननी संबोधली जाते स्त्रीने ठरवले तर ती कोणत्याच कामात मागे नाही जर आपल्या कुटुंबावर काही आघात होणार असेलतर हीच स्त्री आपला प्राणही पणाला लावू शकते असेच काहीसे घडले आहे कजगाव जि प शाळेतील शिक्षक कोमलसिंग धर्मा पाटील हे किडनीच्या दुर्धर आजाराने त्रस्त होते डॉक्टरांनी त्यांना किडनी ट्रान्स्फर करण्याचा सल्ला दिला मात्र किडनी देणार कोण? हा प्रश्न पुढे आला अनेक ठिकाणी प्रयत्न केला मात्र किडनी दान करण्यासाठी अनेकांनी असमर्थता दाखवली त्यात किडनी ट्रान्सफर करणे फार अवघड व किचकट प्रक्रिया मानली जाते मात्र अश्यातच पत्नी पुढें येते आणि आपल्या पतीला वाचवण्यात यशस्वी ही झाली आणि खरी रणरागिणी ठरली 
ही सिनेमाची कहाणी वाटावी अशीच आहे शिक्षक कोमलसिंग पाटील व ऐश्वर्या कोमलसिंग पाटील हे दाम्पत्य कजगाव जि प शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत मात्र गेल्या दोन वर्षांपासून ऐश्वर्या यांचे पती कोमलसिंग पाटील यांना किडनी संदर्भात अडचण आली व त्यांना औरंगाबाद येथील खाजगी डॉक्टरांनी किडनी बदलण्यास सल्ला दिला आणि पतीला वाचवण्यासाठी पत्नीने कुठलाच विचार नकरता तात्काळ होकार दर्शवून  पतीला जीवनदान देऊन कलियुगातील खरीखुरी सावित्री ठरली आहे त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ऐश्वर्या यांचे सर्वत्र कौतुक होत आहे औरंगाबाद येथील डॉ सचिन सोनी यांनी ही अवघड व किचकट ऑपरेशन ची प्रक्रिया पार पाडली आहे

प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसापासून पती कोमलसिंग यांना किडनी संदर्भात अडचण आली व डॉक्टरांनी किडनी बदलण्याचा सल्ला दिला आणि कुठलाच विचार न करता मी माझी एक किडनी देण्याचा निर्णय घेतला आपल्या पतीवर येणारे प्रत्येक संकटात आता पर्यंत सोबत आहे आणि यापुढेही सोबत असणार अशी प्रतिक्रिया ऐश्वर्या पाटील यांनी CNI महाराष्ट्र शी बोलतांना दिली
*या कलीयुगातील सावित्रीला  सलाम*

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.