जिल्हा परिषद निवडणुकीतून सर्व महिलांना राखीव आरक्षणाचा खरच फायदा होईल का? कि फक्त महिलांचे फोटो वापरून सत्ता पुरुष चालवतील ?

 मुख्य संपादक:-दिपक मुलमुले

जिल्हा परिषद निवडणुकीतून सर्व महिलांना राखीव आरक्षणाचा खरच फायदा होईल का? कि फक्त महिलांचे फोटो वापरून सत्ता पुरुष चालवतील ? हा प्रश्न जनसामान्यांना पडलाय.




राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राखीव जागांची सोडत जाहीर झाली आहे,सगळे उमेदवार कस्सून तयारीला लागले आहेत.

  उमेदवार म्हणताना हे लक्षात येतं की खरंच खरे उमेदवार तयारीला लागलेत का? जिथे जिथे महिला राखीव जागा निघाली तिथले पुरुषच पुन्हा तयारीला लागलेत. म्हणजे ज्या पुरुष उमेदवारांना उमेदवारी हवी होती, तेच आताही निवडणूक लढवतील फक्त नाव त्यांच्या बायकोचं लावतील. महिला आरक्षण जाहीर झाल्यापासून हीच परिस्थिती आहे. सरपंच पती, जिल्हा परिषद पती अशा असंविधानिक शब्दांचा जन्म ह्या व्यवस्थेतून झाला. म्हणजे आरक्षण आहे म्हणून नाव बायकोचं पण निवडणूक लढवणारे, निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण करणारे, आणि निवडून आल्यावर कारभार हाकणारे पुरुषच असतात. (काही अपवाद वगळता)

मग खरच ह्या महिला आरक्षणाला काही अर्थ राहतो का?

 महीला अनेक वर्ष निवडणुकीच्या प्रक्रियेपासून लांब होत्या. म्हणून माहितीचा, सार्वजनिक जागांचा जास्त access असलेल्या पुरुषांनी त्यांनी कारभारात मदत करणे अपेक्षित आहे. ना की त्यांच्या जागी स्वतः कारभार हाकणे. 

महिला राखीव जागांच्या अर्थ म्हणजे बॅनर वर नवऱ्याच्या फोटोच्या बरोबर नाईलाजाने छापलेला फोटो एवढाच घेणाऱ्या सर्वच नागरिकांनी हे लक्षात घ्यायला हवं. 

भारतात लोकसंख्येच्या जवळ जवळ ५०% स्त्रिया असताना राजकीय व्यवस्थेत मात्र याचं प्रतिबिंब उलटत नाही. पंचायतीराज व्यवस्थेत महिलांना असलेलं राजकीय प्रतिनिधित्व हे त्यांच्या हक्काचं आहे. त्यांच्या नेतृत्वाला चालना आणि बळ देणारं,  त्यांच्या विकासाला गती देणारं आहे. 

पुरुष सगळा कारभार पुन्हा स्वतःच्या हातात घेऊन मूळ हेतूला हरताळ फासतात. अनेक महिला सरपंच अनेकदा ग्रामसभेला हजर राहत नाहीत. त्यांच्याजागी त्यांचे पती/भाऊ सगळे निर्णय घेऊन मोकळे होतात. फक्त सह्या करणं किंवा अंगठा लावणं एवढच तिचं काम उरतं. ते करण्यासाठीही ग्रामसेवकांना घरी जावं लागतं. पद जरी आलं तरी व्यवस्था जशीच्या तशी आहे. 

ही व्यवस्था बदलायची असेल तर आधी सामाजिक मानसिकता बदलावी लागेल. आणि आपण सगळे मिळून ती बदलवू शकू ह्या विश्वासासकट एक एक पाऊल पुढे टाकत जायला पाहिजे. स्रिया फक्त चूल आणि मुलं नाहीतर राज्य, देश, जिल्हा, तालुका,शहर, गाव,चा कारभार चालवू शकता फक्त त्यांना स्वतंत्रता द्या.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.