माजी उपसभापती पंचायत समिती पाचोरा सौ.रत्नप्रभाअशोक पाटील ह्या पिंपळगांव -भोजे गटातून भाजपा तर्फे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी हालचाली सुरु...

 मुख्य  संपादक-दिपक मुलमुले

माजी उपसभापती पंचायत समिती पाचोरा सौ.रत्नप्रभाअशोक पाटील ह्या पिंपळगांव -भोजे गटातून भाजपा तर्फे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी हालचाली सुरु... 



दिनांक २८ जुलै गुरुवार रोजी जिल्यातील गटांचे राजकीय आरक्षण जाहीर झाल्याने ज्या, त्या गटातील इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. पिंपळगाव हरेश्वर - भोजे जिल्हापरिषद गट हा सर्व साधारण महिला राखीव झाल्याने या गटामध्ये पिंपळगाव हरेश्वर येथील पाचोरा पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. रत्नप्रभा अशोक पाटील ह्या भाजपा पक्षांतर्फे पिंपळगाव हरेश्र्वर-भोजे -वरखेडी जिल्हापरिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असून त्यांनी या गटासाठी मोर्चे बांधणी सुरु केली असून भाजपा कडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

तसेच सौ. रत्नप्रभा अशोक पाटील ह्या पाचोरा पंचायत समितीच्या उपसभापती पदी असतांनाच त्यांनी बरीचशी जनहितार्थ कामे केली आहेत. तसेच त्यांना मूलभूत प्रश्नांची जाण असल्याने पिंपळगाव, वरखेडी गटात सामाजिक, राजकीय कामात त्या सतत सक्रीय असल्याकारणाने त्यांच्या सोबत बराच मोठा कार्यकर्त्यांचा समूह जुडला असल्याने सौ. रत्नप्रभा अशोक पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी या गटातील सर्वसामान्य जनतेतून मागणी असल्याने या भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी साठी आग्रही असून मी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.