भोजे येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न..

 मुख्य संपादक:-दिपक मुलमुले

भोजे येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपणचा  कार्यक्रम संपन्न..



दिनांक 27/07/2022 रोजी श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोजे ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळ मिळून  वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाचे  आयोजित करण्यात आले होते.या वेळी 500 विविध जातीची वृक्ष लागवड करण्यात आली.

आपल्या सभोवतालच्या परिसरात आपल्याला भविष्यासाठी झाडे लावायची गरज सध्या सगळी कडेच आहे पर्यावरणाचा समतोल साधला तरच जीवन सावरले जाईल पर्यावरण जपणे,निसर्ग जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.या नुसार भोजे येथील तरुणांनी वृक्ष लागवड केली आहे तसेच भोजे येथील तरुण मंडळी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.मागील काळात भोजे येथील तरुणांनी स्मशान भूमी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन व्यवथित रित्या करीत आहे.



भोजे ग्रामपंचायत व तरुण मित्र मंडळ यांच्या सहकार्याने भोजे गावासाठी  500 झाडे  मिळाली होती . त्यासाठी तरूण व ग्रामस्थांची वृक्षारोपण आणि संगोपनाची  जबाबदारी घेतली व ती काटेकोर पणे पार पाडत आहे. यावेळी ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य गावातील सर्व तरुण वर्ग,जेष्ठ नागरिक, महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तित राहून सहकार्य केले.



Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.