पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपन व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न...
मुख्य संपादक दिपक मुलमुले 9595470800
पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपन व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न...
दि.16 जुलै रोजी सकाळी 10 वाजेला पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.निसर्गावरील अतिक्रमणामुळे निसर्गचक्र बिघडले आहे. त्यामुळेच कधी अतिवृष्टी, कधी कोरडा दुष्काळ, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निसर्गाची जपणूक करणे आणि हरित सुंदर करणे यासह वृक्षसंवर्धनाचा जगविण्याचा निर्धार केला. झाडे लावण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. निंब, अशोक वृक्ष, वड,पिंपळ, गुलमोहर, आंबा, चिंच,आवळा,नारळ,अशा विविध जातीची 80 च्यावर रोपांची लागवड पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.
त्याच बरोबर जनता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आहे होते,जनता दरबारात आज पेंडिंग असलेल्या केसेस व अर्जाचा निपटारा करण्यात आला.आणि पिंपळगाव हरेश्वर येथील नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशी यात्रा निमित्त ज्यांनी ज्यांनी पोलीस प्रशासनास स्वयंसेवक म्हणून मदत केली अशा सर्व जणांचा सत्कार करण्यात आला.या मध्ये ग्राम विकास मंडळ संचलित ग्राम विकास विद्यायात भाविक भक्तांसाठी फ्री पार्किंग ठेवण्यात आलेली होती.त्या मुळे ग्राम विकास मंडळ अध्यक्ष,मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,व शिक्षक वृंद यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ग्राम पंचायत चे उपसरपंच व सदस्य यांचा पण सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर गोविंद मंदिर संस्थान चे अध्यक्ष,व विश्वस्त यांचा पण यांचा सत्कार पोलीस प्रशासन तर्फे करण्यात आला.पिंपळगाव हरेश्वर येथील बजरंग दल कार्यक्रर्ते यांनी यात्रेसाठी अथक परिश्रम घेऊन दिवसभर स्वयंसेवकांचे काम केले व पोलीस प्रशासनाला व बाहेर गावावरून येणाऱ्या भाविक भक्तांना मदत कार्य केलं त्यामुळे त्यांचाही सत्कार पाचोरा तालुक्याचे डी.वाय.एस.पि.भारत काकडे यांच्या हस्ते सगळ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डी.वाय.एस.पि.भारत काकडे,पाचोरा
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे,पि.एस,आय,अमोल पवार,उपसरपंच सुखदेव गीते, ग्रा.वि.मं.अध्यक्ष देविदास महाजन,गो.मं.सं.अ.शामराव महाजन, मुख्याध्यापक प्रमोद महाजन,प्राद्यापक विक्रम पाटील,पि.बी.पाटील मू.ब.वि. मुख्याध्यपक.ईश्वर पाटील,राजू महाजन,अभिजित पाटील,ग्राम पंचायत सदस्य अंतिम महाजन,राहुल बडगुजर अल्लाउद्दीन तडवी,दिलीप जैन,शुभम तेली,कोमलसिंग देशमुख,गोरख पाटील,विश्वनाथ गुरुजी,अरुण राजपूत,रणजित पाटील,ज्ञानेश्वर बोडखे,पांडुरंग गोरबंजार,मुकेश लोकरे,सर्व पोलीस कर्मचारी व शिपाई सागर सावळे,इ उपस्तित होते तसेच उल्हास पाटील सर व इयत्ता 10 ब चा पूर्ण वर्ग यांनी वृक्ष लागवड करतांना अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment