पिंपळगाव हरे येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्ष व ग्रंथ दिंडी उत्साहात साजरी..
पिंपळगाव हरे येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्ष व ग्रंथ दिंडी उत्साहात साजरी..
पिंपळगाव हरे येथील श्रद्धा इंग्लिश मिडीयम स्कूल ता -पाचोरा यांनी येथील शाळेच्या विध्यार्त्यांनी शाळे पासून ते प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेले पिंपळगाव हरेश्वर येथील श्री समर्थ गोविंद महाराज मंदिर पर्यत पायी दिंडी काढली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई, व वेगवेगळे संत व वारकरी यांची वेशभूषा स्वीकारली. या दिंडीत विध्यार्थ्यानी विठ्ठल भक्तीत विलीन होऊन पायी दिंडीचा आनंद लुटला. मंदिरात दिंडी पोहचल्या नंतर सर्वानी श्री समर्थ गोविंद महाराज यांचे दर्शन घेतले व आषाढी एकादशी याचे महत्व समजून घेतले. मंदिरात सत्यम शिवम सुंदरम प्रार्थना म्हटली श्री गोविंद महाराज मंदिर संस्थान यांच्या वतीने शाळेचे अध्यक्ष भीक नत्थू चौधरी यांचा व शाळेच्या संचालिका ज्योती चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षिका व गाडी ड्रायव्हर बंधू उपस्थित होते.
Comments
Post a Comment