लोहारा डॉ.पंडित विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी )
लोहारा डॉ.पंडित विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
धी शेंदुर्णी सेकं एज्यु. को-ऑप सोसा. द्वारा संचलित डॉ. जे.जी.पंडित मा. विद्यालय .लोहारा, ता. पाचोरा आज विद्यालयात दि 17 -7- 2022 रविवार रोजी संस्थेचा 78 वा संस्था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. एस .आर. माने होते. अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वागत गीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास रामेश्वरतांडा येथील माजी पोलीस पाटील व दानशूर व्यक्तिमत्त्व श्री. मंदोर नाईक , युवा सरपंच दत्तू राठोड ,पद्माकर राठोड ,गोविंद राठोड ,लोहारा येथील मा. सरपंच डॉ बाळू जैन, विविध कार्यकारी सोसायटी विद्यमान चेअरमन शरद सोनार ,मा.मुख्याध्यापक अ. अ.पटेल ,सेवानिवृत्त शिक्षक पी. व्ही .जोशी ,ज्येष्ठ नागरिक उत्तमराव शेळके, कैलास चौधरी,ज्ञानेश्वर जाधव , वाचनालयाचे चेअरमन युवराज शेळके,(बापू ), सामाजिक कार्यकर्ते विवेक जाधव , अण्णा बेलदार,आदर्श शेतकरी गुणवंत सरोदे , नरेंद्र पालीवाल ,अनिल सोनवणे , म्हसास येथील प्रकाश पाटील, भारत पाटील,ग्रामपंचायत सदस्य संदीप देवरे ,सामाजिक कार्यकर्ते ईश्वर पाटील ,सुधाकर पाटील, कासमपुरा येथील किरण परदेशी, जिभू परदेशी, शहापूरा येथील संदीप परदेशी ,अनिल माळी, पत्रकार कृष्णराव शेळके, दिनेश चौधरी , (मेणगावकर ),ईश्वर खरे ,दिलीप चौधरी ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .आर. एस .परदेशी, पर्यवेक्षिका सौ. यु .डी. शेळके, शिक्षक श्री. डी .एम .गरुड ,श्री.पी एम सुर्वे, आर .के .सुरवाडे ,आर .जी. बैरागी , वाय .व्ही .चौधरी , एस. डी .पाटील ,पी .एम .पाटील इ. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवर यांच्या हस्ते सरस्वती माता, सद्गुरु हरिप्रसाद महाराज, कै.आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड ,कै.भास्करराव खंडेराव गरुड यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले .यानंतर मान्यवर मंडळी व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे कर्तव्यदक्ष व आदर्श मुख्याध्यापक श्री .आर. एस. परदेशी यांनी केले.
धी शेंदुर्णी एज्यु -सोसा. या संस्थेचा उदय कसा झाला? याविषयी सविस्तर माहिती व संस्थेचा व शाळेचा लेखाजोखा याविषयी विद्यार्थ्यांना पालकांना परिचय करून दिला.
यानंतर गावातील दानशूर मंडळी व पालक यांच्या हस्ते गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये सर्व वस्तीगृहाच्या मुलांना गणवेश वह्या यांचे वाटप करण्यात आले. तर गावातील इतर गरीब मुलांना गणवेश व वह्या वाटण्यात आल्या. इयत्ता दहावी परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय व विविध विषयात जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी बक्षीसं दिली जातात,यावेळी गावातील पालक व मान्यवर मंडळी यांच्या हस्ते बक्षीसाचा वर्षाव करण्यात आला. शहापुरा येथील संदीप पाटील व अनिल माळी या शेतकरी बांधवानी विद्यालयाला 500 लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी भेट दिल्या .यावेळी त्यांचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी मांनले . यानंतर इयत्ता दहावीच्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे आणि दिव्यांग विद्यार्थी यश अनिल जगताप व त्याच्या पालकाचे स्वागत विद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. मान्यवरांमधून कैलास चौधरी, शरद सोनार यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष एस आर माने यांनी आपल्या मनोगत मधून शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या शैक्षणिक सामाजिक व राजकीय कार्याविषयीची माहिती उपस्थितांना करून दिली. कार्यक्रम संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यालयात वृक्षारोपण देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक श्री व्ही एम शिरपूरे यांनी केले, तर आभारश्री. वाय. पी. वानखेडे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू -भगिनी यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे आज रविवार सुट्टीचा दिवस असून देखील विद्यार्थीव विद्यार्थीनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. याबद्दल मान्यवरांनी सुद्धा विद्यार्थ्यांचं गोड कौतुक केले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटाचे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment