छत्रपती संभाजी नगर येथे ७५ शाळांचा रायन मिनाथॉनमध्ये सहभाग.
छत्रपती संभाजी नगर येथे ७५ शाळांचा रायन मिनाथॉनमध्ये सहभाग. छत्रपती संभाजीनगर: रायन इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित बहुप्रतिक्षित 'रायन मिनाथॉन' स्पर्धेचा समारोप नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बिडकीन येथील ७५ हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेचे अध्यक्ष डॉ. ए. एफ. पिंटो आणि व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारण्यात आली होती. 'शांतीसाठी धावा' या संकल्पनेवर आधारित असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तव आणि प्रार्थनेने झाली. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, निरोगी जीवनशैली आणि क्रीडा भावना रुजवणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत वयोगटानुसार निरनिराळ्या अंतराच्या शर्यती आयोजित केल्या होत्या: * U-12 मुलगे: ३ किमी * U-12 मुली: २ किमी * U-14 मुलगे: ३ किमी * U-14 मुली: ३ किमी * U-16 मुलगे: ४ किमी * U-16 मुली: ३ किमी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत बिडकीन य...