मुख्यालयी न राहणारे वैद्यकीय अधिकारी रडारवर; लोहारा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अहवालानंतर कारवाई : सीईओ


मुख्य संपादक :-दिपक मुलमुले..

मुख्यालयी न राहणारे वैद्यकीय अधिकारी रडारवर; लोहारा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अहवालानंतर कारवाई : सीईओ
जळगाव : पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने एका महिलेची प्रसुती आरोग्य सेविकेच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यात नवजात शिशू दगावल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी चौकशीसाठी पाठविण्यात आले. अहवाल आल्यानंतर तडकाफडकी संबधीत वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले.
दरम्यान जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियुक्त करण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी राहत नसल्याने अनेक तक्रारी असल्याने याबाबत आता प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आले असुन अपडाऊन करणारे वैद्यकीय अधिकारी आता रडारवर असल्याची माहीती सीईओ डॉ. आशिया यांनी दिली आहे.
लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसतांना एक महिलेची प्रसुती झाली. ४ किलो वजनाचे बाळ जन्मले. नवजात बालकाची प्रकृती बिघाडल्याने या नवजात बालकास लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातुन पाचोरा घेऊन जात असता दि. १७ वर रविवार रोजी सकाळी ७ वाजेला त्या बाळाचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी नसल्याने व योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्याने संबधीत वैदयकिय अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
सध्या पावसाळा सुरू असुन ग्रामिण भागात साथीचे रोग, आजार पसरण्याची शक्यता अधिक आहे. नियमानुसार वैद्यकीय अधिकारी हे नियुक्तीच्या ठिकाणी राहणे बंधकारक आहे. मात्र जिल्हाभरात बहुतंश ठिकाणी अधिकारी राहत नसल्याने आता हे वैद्यकीय अधिकारी रडारवर असुन त्यांच्यावर आठवडाभरात कारवाई करण्याचे.
संकेत सीईओंनी दिले आहे. लोहारा प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तात्काळ रवाना करण्यात आले असुन अहवाला नंतर संबधीत दोषींवर कारवाई होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.