सावता महाराज पुण्यतिथी निमित्त पिंपळगाव येथे कार्यक्रम संपन्न..

मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 
सावता महाराज पुण्यतिथी निमित्त पिंपळगाव येथे कार्यक्रम संपन्न
पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा-
 पिंपळगाव हरेश्वर येथे श्री संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त माळी गल्लीतून  आठवडे बाजार मार्गे माळी मंगल कार्यालयापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. माळी मंगल कार्यालयात श्री संत सावता माळी यांच्या फोटोचे पूजन माजी आमदार दिलीप वाघ,उपसरपंच सुखदेव गीते, शालिग्राम मालकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रमोद क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या वेळी सुमित किशोरआप्पा पाटील, कैलास क्षीरसागर,जि.प.सदस्य मधुकर काटे, देविदास महाजन, रवींद्र माळी, कोमलसिंग देशमुख, राहुल बडगुजर, राजू माळी, अर्जुन जाधव सर, सुरेश मालकर, अशोक माळी, कडूबा क्षीरसागर, शशिकांत मालकर, मौजूलाल जैन, अर्जुन मालकर, राजू गीते, दगडू उबाळे, कडूबा गोरे, शिवदास माळी, कुसुमबाई मालकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.