अज्ञात वाहनाच्या धडकेत कुऱ्हाड येथील मूकबधीर दुचाकीस्वार तरुण जागीच ठार..

मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 

अज्ञात वाहनाच्या धडकेत कुऱ्हाड येथील मूकबधीर दुचाकीस्वार तरुण जागीच ठार..
कुऱ्हाड प्रतिनिधी सुनील लोहार...
कुऱ्हाड खुर्द येथील रहिवाशी तरुण अनिल माधव चौधरी वय ३१याचे काल सायंकाळी सहा वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेने जळगाव पाचोरा महामार्गावर नंद्रा गावाजवळ अपघाती निधन झाले.
मयत अनिल हा काल संध्याकाळी जळगाव येथे दुचाकीवर जात असताना नांद्रा गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला त्याच्या निधनाने कुऱ्हाड गावावर शोककळा पसरली. मयत अनिल  हा अत्यंत गरीबीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील असल्याने त्याचा परिवार आजच उघड्यावर  आलेला आहे. अनिल हा मूकबधिर असल्याने शिलाई  (टेलर )कामात हुशार व्यक्तिमत्व म्हणून पंचक्रोशीत परिचित होता. तसेच तो व्यंगचित्रकार देखील होता . काल त्याच्या अपघाताची बातमी धडकताच कुऱ्हाड  येथील भाजप गन प्रमुख जगदीश तेली ,सरपंच कैलास भगत, शेतकरी सेनेचे अरुण भाऊ पाटील , पत्रकार सुनील लोहार, उपसरपंच अशोक देशमुख दिगंबर चौधरी, कैलास चव्हाण ,अनिल चे दोघे भाऊ आदींनी पाचोरा येथे खाजगी व सरकारी दवाखान्यात धाव घेऊन सर्वतोपरी मदत केली. अनिल च्या पश्चात पत्नी, दोन वर्षाची मुलगी, आई ,आजी व दोन भावंडे असा मोठा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..