विजेच्या झटक्याने शिंदाड येथील शेतकऱ्याचा मृत्यू...
मुख्य संपादक:- दिपक मुलमुले
विजेच्या झटक्याने शिंदाड येथील शेतकऱ्याचा मृत्यू...
तालुक्यातील शिंदाड येथील शेतकऱ्याचा शेतात असलेल्या विजेच्या खांबाचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, “तालुक्यातील शिंदाड येथील शेतकरी संजय दगा पाटील (वय – ४५) हे आज बुधवार, दि. २० जुलै रोजी शेतातील कपाशी पिकाला फवारणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास संजय पाटील हे फवारणी करत असतांना शेतात असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी संजय पाटील यांना मृत घोषित केले.” घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत संजय पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असुन अतिशय मनमिळाऊ व होतकरू असलेल्या संजय पाटील यांच्या अकस्मात मृत्युने परिसरात शोककळा पसरली आहे.
Comments
Post a Comment