N.M.M.S परीक्षेत ग्राम विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश..
N.M.M.S परीक्षेत ग्राम विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश.. सन 2022 - 23 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांची (N. M. M. S) परीक्षेचा निकाल दि. 29/08/2022 रोजी जाहीर झाला. त्या परीक्षेत ग्राम विकास विद्यालयातील 9 विद्यार्थी पास झाले अन त्यापैकी 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र झाले आहे.पात्र विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंत शिक्षणाच्या खर्चा साठी वर्षाला 12 हजार रुपये मिळतात. शिष्यवृत्तीसाठी 1) चि. सिद्धेश विजय देव,2)चि. स्वरूप मुकेश चौधरी,3)चि. सुशांत भारत मंडावरे, 4)चि. दीपक विनोद नाईक, 5)कु.स्वरा सचिन महाजन या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री.पी.एस.महाजन सर उपमुख्याध्यापक श्री.पी.जी.तेली सर, श्री.पी.ओ.चौधरी सर श्री.व्ही.आर.पाटील सर श्री.एस.एस.झेरवाल सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.ए.एम.पाटील सर आणि श्री.आर.ए.देशमुख सर यांचे देखील गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले.