माजी जिल्हापरिषद सदस्य मधु भाऊ काटे यांनी आपल्या घरावर उभारला 'तिरंगा' स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा' मोहिमे अंतर्गत

मुख्य संपादक :-दिपक मुलमुले 9585470800
 
माजी जिल्हापरिषद सदस्य मधु भाऊ काटे यांनी आपल्या घरावर उभारला 'तिरंगा' स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा' मोहिमे अंतर्गत.

पिंपळगाव हरे : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या अनुषंगाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्यातील स्मृती तेवत रहाव्यात व देशभक्तीची ज्वाजल्य भावना कायमस्वरुपी मनात राहावी, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेली स्फूर्ती व देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी या उद्देशातून दि. 13 ऑगस्ट 2022 ते दि. 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्रशासानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण शहरात 'हर घर तिरंगा' उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर कालावधीत शहरातील प्रत्येक शासकीय/निमशासकीय व खासगी आस्थापनांवर त्यांनी त्यांच्या इमारतींवर व नागरिकांनी स्वत:च्या घरावर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने उभारणी करावयाची आहे. राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या, विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत/पॉलिस्टर/लोकर/सिल्क/खादीपासून बनविलेल्या कापडाचे असावेत. सर्व नागरिकांना राष्ट्रध्वज माफक दरात शहरात विविध ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले असून नागरिकांनी राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने सन्मानपूर्वक उभारणी करताना जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी म्हणजेच भारतीय ध्वजसंहितेचे पालन करावे, असे आवाहन विविध पातळीवर शासनाद्वारे केले जात आहे.
याअनुषंगाने पिंपळगाव हरे -शिंदाड गटाचे माजी जिल्हापरिषद सदस्य मधु भाऊ काटे  तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस  जळगाव जिल्हा   यांनी शनिवार, दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी आपल्या निवासस्थानी म्हणजेच घरावर राष्ट्रध्वज तिरंगा'ची उभारणी करुन मानवंदना दिली. प्रत्येक देशवासियाने 'तिरंगा'चा सन्मान राखून आपल्या घरावर तिरंगा उभारलाच पाहिजे असेही यावेळी  माजी जिल्हापरिषद सदस्य मधु भाऊ काटे म्हणाले. 

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.