खाजगी प्राथमिक विद्यामंदिर येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ संपन्न.
खाजगी प्राथमिक विद्यामंदिर येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ संपन्न.
आज दिनांक 17/08/ 2022 रोजी. पिंपळगाव हरेश्वर येथील 'खाजगी प्राथमिक विद्या मंदिर' येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्काराचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आमच्या शाळेत श्री छोटू त्रंबक सोनवणे भारतीय सेनादलातील निवृत्त सैनिक यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री शशिकांत सुधाकर महालपुरे सरांनी शाल व श्रीफळ देऊन केला तसेच या कार्यक्रमा प्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री जे.के. तडवी सर व श्री दीपक हरी महाजन सरांनी सत्कार मूर्तींचा परिचय करून दिला. त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून श्री महालपुरे सरांनी स्वातंत्र्यसैनिकांबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
Comments
Post a Comment