वैरण (चारा )घेण्यासाठी गेलेल्या लोहारा येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू.

मुख्य संपादक :-दिपक मुलमुले 
वैरण (चारा )घेण्यासाठी गेलेल्या लोहारा येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू.


 दिनेश चौधरी,लोहारा (प्रतिनिधी ),लोहारा येथे  ता. ११रोजी येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली असून संपूर्ण लोहारा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 नीलेश पाटील,वय 25 हा गुरुवारी  सकाळी सातच्या सुमारास गुरांना वैरण टाकण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी त्याला सर्फ दवश झाल्याची घटना घडली,  त्याच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्याची प्राणजोत मालावली. नीलेश सुधीर पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नीलेश हा सकाळी शेतात जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेला होता. मात्र वैराणाखाली असलेल्या विषारी सर्पाने दंश केला. त्या दरम्यान त्याला चक्कर यायला लागले. त्याच अवस्थेत तो घरी चालत आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून नीलेशची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेण्यास सांगितले. जळगाव जात

असताना रस्त्यातच नीलेशची प्राणजोत मावळली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी नीलेशला तपासणीअंती मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेहाला लोहारा येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीलेशने जळगाव येथे डी. फार्मची पदवी घेतली होती. तो गोवा येथे नोकरीसाठी गेला होता.

सुट्टी असल्याने तो गावी आलेला होता. नोकरी करून घर बांधेल, असे तो घरच्यांना सांगत होता. असे वडील टाहो फोडत सांगत होते. खूप मोठी स्वप्ने बघितली होती. नीलेशच्या जाण्याने सर्व धुळीस मिळाली. नीलेश हा शांत व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याने सर्वांची मन जिंकून घेतली होती. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून, त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नीलेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!