मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरे या विद्यालयात दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा.
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 9595479800
मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरे या विद्यालयात दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा श्रीकुष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे दही हंडी. या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. पण आपल्याला माहिती आहे का या सणाला का साजरे केल्या जाते, जेव्हा लहानपणी भगवान श्रीकृष्ण दही दुध खाण्यासाठी मातीच्या वर लटकविलेले मडके फोडून त्यामधील दही आणि दुध फस्त करून टाकत,जर मडके जास्तीचे वर टांगलेले असेल तर श्रीकृष्ण आपल्या मित्रांना घेऊन त्या मडक्याला फोडत असत. आणि त्यामधील दुध, दही, ताक सर्वांमध्ये वाटून खाऊन घ्यायचे. आणि त्यांच्या ह्या गोष्टींना आठवण ठेवत देशात सगळीकडे कृष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी दही हंडीचा उत्सव साजरा केल्या जातो. या हेतूने आज मूकबधिर निवासी विद्यालयातही दहीहंडी साजरी करण्यात आली श्रीकृष्णाच्या रुपात चि. सुनिल बिऱ्हाडे हा विद्यार्थी होता. सदर प्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य व ओले होण्याचा आनंद ही मूकबधिर बाळगोपाळांनी घेतला तसेच दहीहंडी फोडण्यासाठी उभाराहून मनोर ही तयार केला. दहीहंडी वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष पी बी पाटील, सौ. कोकिळा पाटील, सौ.वंदना पाटील, सौरभ पाटील व गावातील नागरिक, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील,शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते. सदर दहीहंडी कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment