पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न

पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी) - देशात कॉंग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने आझादी की पदयात्रा चे आयोजन केले त्याचाच एक भाग म्हणून पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील पदयात्रा संपन्न झाली.


पाचोरा तालुका कॉंग्रेस चे अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आझादी की पदयात्रा ची सुरवात पुनगांव परीसरा पासून करण्यात आली सदरची यात्रा समारोप च्या दिवशी जारगाव, चिंचखेडे, सारोळा खु, खडकदेवळा बु आणि खडकदेवळा खुर्द यासह वाघुलखेडा, सारोळा बु ला समारोप करण्यात आला. या पदयात्रेत जनतेने कॉंग्रेस पदाधिकारी यांना आपल्या समस्यांचे गर्हाणे सांगितले. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होवुन देखील घराचे छत नाही तर तिरंगा कुठे लावायचा असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेने कॉंग्रेस पदाधिकारी यांच्या कडे व्यक्त केला.
पदयात्रेतील रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता., यावेळी पदयात्रेत तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, ओबीसी सेल शहर अध्यक्ष .शरीफ शेख, अलताफ शेख   सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, रहिम शेख, अलम शेख , सद्दाम शेख अरबाज खान, अमजद खान, , रवी सुरवाडे, लक्ष्मण पाटील, अरुण पाटील, बापु पाटील, विश्वास पाटील, आदींनी सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.