धक्कादायक पहूर हादरले;पहूर येथील सराफा व्यापाराच्या खून. !!!
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले
धक्कादायक पहूर हादरले;पहूर येथील सराफा व्यापाराच्या खून. !!!
तालुक्यातील पहूर येथील सराफा व्यापाराच्या खून झाल्याची घटना समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी तीन संशयित ताब्यात घेतले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर कसबे तालुका जामनेर येथील पूनमचंद गुलाबचंद वर्मा (वय 42 ) यांचे लोहारा तालुका पाचोरा येथे मेघराज ज्वेलर्स या नावाने सोन्या चांदीचे दुकान आहे. ते नेहमी प्रमाणे आपले दुकान बंद सायंकाळी सात वाजता लोहारा येथून पहुरकडे येत असायचे. परंतू १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गोगडीच्या पुलाजवळ रक्तबंबाळ अवस्थेत मयत स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मयत वर्मा यांचा कुठल्या तरी तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला आहे. तर वर्मा यांच्या जवळ असलेली बॅग व मोबाईल हे गायब असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी लुटपाटच्या हेतूने हा खून झालाय का?, याबाबत चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, पोलिसांनी तीन संशयित ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली आहे.
मयत पूनमचंद गुलाबचंद वर्मा यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, व दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे हे पथकासह घटनास्थळी धाव घेतली वर्मा यांचा मृतदेह पहुर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात प्रकाश शांतीलाल वर्मा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे करीत आहे.
Comments
Post a Comment