भोजे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव अंतर्गत दि. 13 जुलै रोजी ध्वजारोहण व इतर कार्यक्रम साजरे केले.

 

भोजे प्रतिनिधी:- आबा पाटील

भोजे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव अंतर्गत दि. 13 जुलै रोजी ध्वजारोहण व इतर कार्यक्रम साजरे केले. 



 दि 13 रोजी रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा भोजे येथे सकाळी 7:40 वाजता शाळेतील विद्यार्थिनी वैष्णवी चौथे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 



त्या नंतर सर्वांनी मिळून पर्यावरण शपत घेतली तसेच शाळेतील विध्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घेण्यात आल्या. स्पर्धे मध्ये शाळेच्या सर्व मुलांनी सहभाग नोंदविला. पहिल्या एक दोन आणि तिसऱ्या क्रमांक येणाऱ्या मुलांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी व्यवस्थापन समिती सदश्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, तसेच गावातील नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदश्य योगिता राऊत, सुवर्णा चौथे, जयश्री जाधव, शिवलाल लोंढे, मुख्याध्यापक शांताराम कुंभार, उपशिक्षक किशोर बिरहरी, शांताराम वानखडे, व सर्व शिक्षक वृंद उपस्तित होते.



Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!