१० वर्षांपासून तो करतो मोफत राष्ट्रध्वजाची इस्त्री.....सोयगावच्या तरुणाची अशीही देशसेवा...

 १० वर्षांपासून तो करतो मोफत राष्ट्रध्वजाची इस्त्री.....सोयगावच्या तरुणाची अशीही देशसेवा...



सोयगाव(,जि. औरंगाबाद )दि.१२...स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोयगावातील एक तरुण तब्बल दहा वर्षापासून राष्ट्रध्वजाला इस्री करून सलामी देत असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आल्याने तालुका प्रशासनालाही याबाबत कौतुक वाटल्याने त्याचेवर कौतुकाची थाप पडली आहे.शहरातील बसस्थानक परिसरात इस्रीचे दुकान असलेल्या तरुणाने तब्बल दहा वर्षापासून शासकीय कार्यालयांच्या राष्ट्रध्वजाला इस्री करण्याचा बहुमान मिळविला आहे.या प्रकारातून या तरुणाची देशभक्ती दिसून आली आहे.देशावर आपली नितांत भक्ती असेल तर जवान बनून सीमेवर जात देशविरोधी कारवाई करणाऱ्यांशी झुंज द्यावीच लागते असे नाही,तर ती भक्ती साध्या घरबसल्या कामातूनही साध्य करता येऊ शकते.याबाबत जिवंत उदाहरण द्यावे लागेल सोयगाव येथील दत्तू रोकडे या तरुणाचे.हा तरुण गेल्या १० ते ११ वर्षांपासून राष्ट्रध्वजाची (तिरंगा झेंडा) मोफत इस्त्री करून दिली मात्र वाढत्या महागाईमुळे सध्या अल्पदरात इस्त्री करत असल्याने त्याच्या या देशभक्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, ४०० पेक्षा अधिक राष्ट्रध्वज या पुर्वी त्याने मोफत इस्त्री करून दिले आहेत. दत्तु प्रल्हाद रोकडे  वय ४४ रा. सोयगाव,ता.सोयगाव असे या देशभक्त तरुणाचे नाव आहे.

  हा तरुण आपला वडिलोपार्जित परीटचा (धोबी)व्यवसाय करीत असताना स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी त्याच्याकडे राष्ट्रध्वज यायचे त्याला पैसेही संबंधित लोक देऊ करायचे .परंतु मनातील देशभक्तीला हे मान्य नसल्याने त्याने कधीही पैसे घेतले नाही,गेल्या १० ते ११ वर्षांपासून तो स्वातंत्र्य,प्रजासत्ताक,  मुक्तीसंग्रामदिनाला सोयगाव परिसरातील तहसील, दुय्यम निबंधक पोलीस ठाणे पंचायत समिती, ग्रामपंचायात,सोसायटी,विविध बँका, विविध शाळा ,टपाल कार्यालय,आरोग्य विभाग,महाविद्यालयातील राष्ट्रध्वज मोफत इस्त्री करून देत गेला.गेल्या १० वर्षात त्याने ४०० पेक्षा अधिक राष्ट्रध्वज इस्त्री करून दिले आहेत.हे विशेष मराठवाडा मुक्ती संग्रामदिन, स्वातंत्र्यदिन,प्रजासत्ताकदिन,अशा राष्ट्रीय दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज तिरंग्याला सलामी देण्यासाठी देशभक्त आवर्जून उपस्थित राहतात, परंतु या तरुणाची ही अनोखी देशभक्ती व देशप्रेम खरच कोतुकास्पद आहे हे मात्र नक्की....!

 प्रतिक्रिया-----

स्वातंत्र्यदिन,प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी शाळेच्या कार्यक्रमातुन स्वातंत्र्याचा इतिहास सांगितला जात असे.यातून मनात देशप्रेम रुजले.आपल्या हातून ही देशभक्ती व्हावी ,या इच्छेतुन मोफत राष्ट्रध्वज इस्त्री करून देण्याची कल्पना सुचली. गेल्या दोन वर्ष कोरोना महामारीत इस्त्री व्यवसाय पुर्णतः कोलमडला दरम्यान महागाई भरमसाठ वाढ,कोळसा व गॅस आदी मध्ये वाढ झाल्याने यंदा मात्र अल्पशा दराने राष्ट्रध्वजाचा ची इस्त्री करत आहे.

  दत्तु प्रल्हाद रोकडे

देशभक्त तरुण

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.