पिंपळगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि. श्री.महेंद्र वाघमारे सर यांच्या घरी झालीआगळी वेगळी रक्षाबंधन साजरी.

 मुख्य संपादक :- दिपक मुलमुले ९५९५४७०८००

पिंपळगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि. श्री.महेंद्र वाघमारे सर यांच्या घरी झालीआगळी वेगळी रक्षाबंधन साजरी.







प्रत्येकजण आपापल्या कुटूंबियांसमवेत उत्साहात सण  साजरी करत असताना ‘जनतेची सुरक्षा हेच आमचे सण  मानून ऐन सणासुदीत  चोखपणे कर्तव्य बजावणाऱ्या  पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या परिवाराने  रोज मजुरी करून गुजराण करणाऱ्या गरीब घरच्या मुलींना आपल्या घरी बोलावून   रक्षा बंधन साजरी केली आहे.पोलिसांना कोणतेच छोटे मोठे सण देखील देखील आपल्या परिवारासमवेत साजरा करता येत नाही. उलटपक्षी सणावाराच्या दिवशी कोणावरही विघ्न येवू नये यासाठी डोळ्यात तेल ओतून त्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. 



पिंपळगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे   यांनी आपल्या परिवारासमवेत कर्तव्य बजावत असतानाच दुर्लक्षित, गोरगरीबांत मिळसून त्यांच्यासमवेत साजरी  केली आहे. याअंतर्गत रक्षा बंधन  रोजी त्यांनी सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांसवमेत पोलीस स्टेशन आवारातील  येथील भिल्ल समाजातील हातमजुरीवर गुजरान करणाऱ्या गरीब महिलासमवेत लहान मुली सोबत रक्षा बंधन साजरी करून एक सुखद धक्का दिला. यावेळी स.पो.नि.महेंद्र वाघमारे,पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलीस हवालदार रणजित पाटील  यांच्यासमवते पिंपळगाव पोलीस स्टेशन चे  पोलीस कर्मचारी  यांची उपस्थिती होती. 



कोणताही गाजावाजा नाही की, पूर्वकल्पना नाही. अशा स्थितीत अचानकपणे  खाकीच्या रूपात आलेल्या भावांकडून मिळालेले प्रेम, आपुलकी आणि रक्षा बंधनाच्या  भेटीने  लहान मुलींनी  गहिवरून आले. तर नागरीकांची सर्व सण आनंदात साजरी व्हावी यासाठी कुटूंबियांपासून दूर राहून चोविस तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांनाही यामाध्यमातून बहिणीची माया मिळाल्याने ते देखील भारावले. तसेच स.पो.नि.महेंद्र वाघमारे यांच्या दोघी मुलांनी राखी बांधायला आलेल्या मुलींसोबत रक्षाबंधन साजरी करून त्यांना आपल्या घरी अल्पोआहार दिला,तसेच सौ.सुनीता महेंद्र वाघमारे ताई ह्या गरीब वस्तीतील मुला-मुलींचे रोज क्लासेस कोणत्याही प्रकारची फी नं घेतात नियमित पणे घेत असतात.त्यांच्या सर्व परिवाराच्या या कार्याचे सर्व सामन्यातून कौतुक होत आहे

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.