जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेणीत साकारणार ५२ फुटांचा राष्ट्रध्वज

 जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेणीत साकारणार ५२ फुटांचा राष्ट्रध्वज 



फर्दापूर (प्रतिनिधी) जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत १५ ऑगस्ट ला ५२ फुट उंचीवर तिरंगा फडकावण्याची तयारी भारतीय पुरातत्त्व विभागाने गुरुवार दि.११ पासून सुरु केली आहे.त्यासाठी गुरुवारी ५ वाजता भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सराव केल्याचे दिसून आले आहे.आझादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्त्व विभागा कडून अजिंठा लेणीत ५२ फुट उंचीवर भव्य तिरंगा झेंडा फडकावण्यात येणार आहे आठ बाय बारा अशी या झेंड्याची लांबी व रुंदी आहे.अजिंठा लेणीच्या पायथ्याशी भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यालया जवळील मोकळ्या जागेत हा झेंडा फडकावला जाणार आहे.१५ ऑगस्ट ला अजिंठा लेणीत हा झेंडा कोणाच्या  फडकाविणार हे अजून कळाले नसलेतरी

हा भव्य तिरंगा कसा फडकवावा लागणार याची तयारी व सराव  गुरुवारी भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अजिंठा लेणीत सुरु केला असल्याचे दिसत होते.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..