राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळले सोयगावचे तहसील...स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येचा जागर..

 राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळले सोयगावचे तहसील...स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येचा जागर..


                           सोयगाव तहसील कार्यालयाला राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजाळा देण्यात आला...

  सोयगाव,दि.१२..स्वराज्य महोत्सव आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावान्मिमित्त शुक्रवारी हरघर तिरंगा मोहिमेच्या पूर्व संध्येला सोयगावचे तहसील कार्यालयाला राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळवून हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आल्याने सोयगाव तहसील कार्यालय आता तीन दिवस राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळवून आठवणींना उजाळा देणार असल्याचा संदेश देणार आहे.शनिवार पासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला प्रारंभ होत आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात सोयगाव तहसील कार्यालयाला राष्ट्रध्वजाच्या तिरंगी रंगांनी उजळविण्याचा निर्णय घेतला आहे.


   सोयगाव तहसील कार्यालयाला तिरंगी रंगांच्या लाईट लावून तहसील कार्यालयाचा कायापालट करून हरघर मोहिमेचा संदेश देण्याचा संकल्प शुक्रवारी पूर्व संध्येला करण्यात आला असून अमृत महोत्सवाचा शुक्रवारी पूर्वसंध्येपासून सोयगाव तहसील कार्यालयात जागर करण्यात आल आहे.तालुक्यात नागरिकांनी हरघर तिरंगा मोहीम राबवियाचा संदेश तहसील कार्यालयाच्या वास्तूतून देण्यात आला आहे.त्यामुळे आगामी तीन दिवस आता सोयगाव तहसील कार्यालय तिरंगी राष्ट्रध्वजाच्या भूमिकेत दिसणार आहे.याकामी तहसीलदार रमेश जसवंत यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे,हेमंत तायडे,विठ्ठल जाधव,शरद पाटील,अनिल पवार,संभाजी बोरसे संजय नावकर,शिवाजी शेरे,आदींनी पुढाकार घेवून हि मोहीम राबविली आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..