पिंपळगाव हरे.येथील पोलीस स्टेशन राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळले ...स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येचा जागर..

मुख्य संपादक :-दिपक मुलमुले 
पिंपळगाव हरे.येथील पोलीस स्टेशन राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळले ...स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येचा जागर..
   पिंपळगाव पोलीस स्टेशन ला  राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजाळा देण्यात आला...

  पिंपळगाव   हरे दि.13 ऑगस्ट स्वराज्य महोत्सव आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावान्मिमित्त शनिवारी  हरघर तिरंगा मोहिमेच्या पूर्व संध्येला पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन ला  राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळवून हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आल्याने पिंपळगाव  हरे पोलीस स्टेशन ला  आता तीन दिवस राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळवून आठवणींना उजाळा देणार असल्याचा संदेश देणार आहे.शनिवार पासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला प्रारंभ सुरु झाला आहे  
त्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन ला  राष्ट्रध्वजाच्या तिरंगी रंगांनी उजळविण्याचा निर्णय घेतला आहे.
   पिंपळगाव  हरे पोलीस स्टेशन तिरंगी रंगांच्या लाईट लावून 
पोलीस स्टेशनचा कायापालट करून हरघर मोहिमेचा संदेश देण्याचा संकल्प शनिवारी  पूर्व संध्येला करण्यात आला असून अमृत महोत्सवाचा शनिवारी पूर्वसंध्येपासून पोलीस स्टेशन  येथे  जागर करण्यात आल आहे.गावातील व परिसरातील नागरिकांनी हरघर तिरंगा मोहीम राबवियाचा संदेश पिंपळगाव पोलीस स्टेशन  कार्यालयाच्या वास्तूतून देण्यात आला आहे.त्यामुळे आगामी तीन दिवस आता पिंवळगाव हरे  पोलीस स्टेशन  तिरंगी राष्ट्रध्वजाच्या भूमिकेत दिसणार आहे.याकामी पिंपळगाव  हरे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.महेंद वाघमारे सर  यांच्या मार्गदर्शनाखाली  पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांनी  हि मोहीम राबविली आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..