मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले(पाटील)9595470800
मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा...
दि.१५ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी दिव्यांगांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थी संघ संचलित, मूकबधिर निवासी विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या आठवड्यापासून विद्यालयात विद्यार्थ्यांच्या चित्रकला , रांगोळी , मैदानी खेळ,नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. अतिशय आनंदाने उत्साहत देशभक्तीने प्रेरित होऊन अमृत महोत्सव विद्यालयात साजरा करण्यात आला.
घर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश होता. विद्यालयातील झेंडावंदन मा. यादव विठ्ठलराव सिनकर (आदर्श शिक्षक जि.प. जळगाव पुरस्कृत) पाचोरा यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
सदर प्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कवायतीचे सादरीकरण केले. कवायतीचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले. तसेच मागील वर्षी प्रथम व द्वितीय क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले इ.१ली.प्रथम चि. ओम जाधव द्वितीय चि.भावेश माळी , इ.२ री. चि. रामधन माहेर द्वितीय चि.अनिल भिल इ.३ री. चि. रवींद्र मोरे द्वितीय चि. करण पवार इ.४ थी. चि. दीपक बोरसे द्वितीय चि. सारंग चंदने या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, ग्रामस्थ, पत्रकार किशोर लोहार माजी सरपंच सुखदेव गीतेसर, विठ्ठल नारायण गीते, अशोक पाटील, ईश्वर रघुनाथ पाटील, बी.आर. महाजन सर, ईश्वर गिते,वसंत माळी गुरुजी, गुणवंत उभाळे प्रशांत सिनकर, श्रीमती शोभाताई सिनकर, कोकिळा पाटील वंदना पाटील, स्वाती पाटील, अनिता महाजन, सुनीता गिते, रोहिणी देशपांडे, ऐश्वर्या पाटील, शोभा पाटील, तसेच संस्थेचे पदाधिकारी श्री आर.डी. देशमुख सर, पी.बी.पाटील साहेब, एस.एस. पाटील, डी. एस. पाटील सर, रमेश देशपांडे साहेब, शांताराम मानेसर, नामदेव माळी, दिवाकर बडगुजर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद महाजन यांनी केले आलेल्या पाहुण्यांचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment