सोयगाव पोलीस पोळा व गणेशोत्सव साठी अलर्ट...नांदगाव तांड्यात छापा..

सोयगाव पोलीस पोळा व गणेशोत्सव साठी अलर्ट...नांदगाव तांड्यात छापा..

सोयगाव, दि. आगामी पोळा आणि गणेशोत्सव दारूमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी सोयगाव पोलिसांचे अवैध दारू विक्रीवर लगाम घालण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले असून मंगळवारी या पथकाने नांदगाव तांडा ता सोयगाव येथे गावरान(हातभट्टीची) अवैध दारू दहा लिटर कब्जात बाळगून विक्रीच्या उद्देशाने रंगेहात पकडून त्याचे कडून अंदाचे दोन हजार रु चा मुद्देमाल हस्तगत केला आहे
   देवमन किसन सोनवणे वय 45 वर्ष रा.नांदगाव ता. सोयगाव असे गावरान अवैध दारूविक्री करतांना आढळून आलेल्या चे नाव असून मंगळवारी त्यास पोलिसांच्या विशेष पथकाने रंगेहात पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे  मौजे नांदगाव येथे घराचे बाजूला सदर इसम अवैध दारूची विक्री करतांना रंगेहात आढळून आला आहे.त्याच्याकडून 2000/- रुपये किमतीच्या 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत करण्यांत आली आहे. पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या पथकातील अजय कोळी,उपनिरीक्षक सतीश पंडित, राजू बर्डे, आदींच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.
---गणेशोत्सव आणि पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव पोलिसांचे अवैध दारूविक्री विरोधात पथक स्थापन करण्यात आले असून अवैध दारू विक्रीचा प्रकार आढळुन आल्यास सोयगाव पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी केले असून बातमीदार चे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..