जि. प. प्राथमिक शाळा, वरसाडे तांडा येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
जि. प. प्राथमिक शाळा, वरसाडे तांडा येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
----" ओवाळिती मी लाडक्या भाऊराया ....! या ओळींची आठवण आज जि. प . शाळा वरसाडे तांडा येथे पहावयास मिळाली. सामाजिक बांधिलकीचे नाते जपुन शाळेतील बाल गोपालांनी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरा केला.
भावाला राखी बांधली नाही व भावाने भेट दिली नाही. तर नक्कीच मनाला बोचते. भावाचे प्रेम बहिणीला मिळावे. व बहिणीचे प्रेम व आशिर्वाद भावाला मिळावे. त्यांच्या प्रेमाची व मायेची साद मिळावी. या उदात्त हेतुने हा सह शालेय उपक्रम आज शाळेत राबविण्यात आला.
प्रत्येक वर्गातील मुलींनी आपल्या वर्गातील मुलांना राखी बांधून व चॉकलेट देऊन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश महाजन सर यांनी या सणाचे महत्त्व व उपयुक्तता याबद्दल विद्यार्थींना माहिती व मार्गदर्शन केले. या सण उत्सवात शाळेतील शिक्षक वृंद श्री. विनायक राऊत राय सर, श्री. प्रकाश पाटील सर, श्री. विजय नगरे सर श्री.भिंगोले सर उपस्थित राहून सहभाग घेतला.
Comments
Post a Comment