ब्रेकिंग : मुक्ताईनगरात महिलेचा खून :कॅरीबॅगमध्ये बांधलेलामृतदेह आढळला.

ब्रेकिंग : मुक्ताईनगरात महिलेचा खून :कॅरीबॅगमध्ये बांधलेला
मृतदेह आढळला.


मुक्ताईनगर प्रतिनिधी :-पंकज तायडे   
       मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेचे अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करून मृतदेह पिशवीत बांधून फेकण्यात आल्याने परिसर हादरला असून एकच खळबळ उडाली आहे.

कुंड गावाजवळ मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गवर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी एका महिलाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह हा जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग्जमध्ये भरून तिथे टाकण्यात आले असून डोक्याला जबर मार लागला आहे.
संबंधीत महिलेची ओळख पटली नसून तिचे वय साधारणपणे ४० ते ४५ वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह हा वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणी पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..