द वर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न..

 मुख्य संपादक :- दिपक मुलमुले ९५९५४७०८००

द वर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.. 



द वर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी स्कूलमध्ये असलेल्या श्रीकृष्ण मंदिरावर व शाळेवर रोषणाई करण्यात आली तसेच मंदिरामध्ये फुलांची आरास करण्यात आली. त्यावेळी पाचोर्‍यातील व परिसरातील भाविकांनी व शाळेच्या विद्यार्थी व पालक यांनी दर्शन घेतले यावेळी शाळेतर्फे भाविकांना साबुदाणा खिचडी व प्रसादाचे वाटप करण्यात आले.



तसेच दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या  जल्लोषात साजरा करण्यात आला. शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक चे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांनी उत्कृष्ट प्रतिसाद नोंदवला.  संस्थेचे चेअरमन श्री विलास बिडकर, सचिव सौ साधना बिडकर, संस्थेचे अध्यक्ष श्री देवेंद्र बिडकर, संचालक श्री निखिल बिडकर सदस्य सौ शेफाली बिडकर व सौ शिवानी बिडकर यांनीही कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक वृंद, शाळेचे बस चालक, हेल्पर्स, विद्यार्थी यांनी सहकार्य केले. अशा रीतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम शाळेत उत्साहात संपन्न झाला. 



Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..