श्रद्धा इंग्लिश मिडीयम स्कुल पिंपळगाव [हरे ] ता. पाचोरा येथे दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 9595470800
श्रद्धा इंग्लिश मिडीयम स्कुल पिंपळगाव [हरे ] ता. पाचोरा येथे दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत दहीहंडी फोडली व प्रसाद वाटप झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी फार उत्साह दर्शवला व आनंद घेतला.
या कार्यक्रमात शाळेतील बाल गोपालांनी कृष्ण कन्हैयाच्या गीतांवर ठेका धरला तसेच गीतगायन सुद्धा केले...!!
कार्यक्रमासाठी काही विद्यार्थ्यांनी अगदी कृष्ण कन्हैय्या सारखाच पोशाख परिधान केला होता तर काही विद्यार्थिनींनी राधेचा पोशाख तर काहींनी गोपिकांचा पोशाख परिधान केला होता, तसेच उर्वरीत विद्यार्थ्यांनी पारंपारीक पोशाख परिधान केला होता.कार्यक्रमाच्या शेवटी श्रीकृष्ण बनलेल्या कन्हैयांनी दहीहंडी फोडली.नंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे अध्यक्ष भिका चौधरी व संचालिका ज्योती चौधरी व शाळेतील शिक्षिका आणि रिक्षा ड्रायव्हर व पालकांचे सहकार्य लाभले.हा कार्यक्रम अगदी उत्साहात व आनंदात पार पडला.
Comments
Post a Comment