Posts

माणुसकी फाउंडेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सायली महाजन...

Image
माणुसकी फाउंडेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सायली महाजन... माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या जळगाव जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपदी कु. सायली महाजन यांची निवड झाली आहे. मूळच्या खडका तालुका भुसावळ येथील रहिवासी असलेल्या कु. सायली गणेश महाजन या नेहमीच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असता. त्या क्षत्रिय मराठा फाउंडेशन सोशल मीडियाच्या जळगाव जिल्हा प्रमुख, अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, विद्याथी संघटना, जळगावच्या युवती प्रमुख व नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुका सचिव आहेत. त्यांच्या या साजिक कार्याची दाखल घेत संस्थेचे अध्यक्ष विवेक राजापुरे यांनी त्यांची हि नियुक्ती केली आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक, विकासात्मक व देश सेवेच्या कार्यात नेहमी अग्रेसर राहणार असल्याचे कु. सायली यांनी यावेळी सांगितले. त्यांची हि सर्व सामाजिक कार्ये आई रेखाताई महाजन, काका व खडका येथील माजी सरपंच भैया महाजन, कमलाकर महाजन, शंकर महाजन तसेच सर्व मित्र परिवार यांच्या सहकार्याने व जबाबदारीने योग्यरीत्या पार पडणार असेही त्यांनी सा...

सत्यशोधक समाज संघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

Image
सत्यशोधक समाज संघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.         सत्यशोधक समाज संघ जळगाव तर्फे  विश्वभुषण भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने रेल्वे स्टेशन जळगाव समोरील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनाप्रसंगी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,ऑल इंडिया सेन समाज,देवकाई प्रतिष्ठान संघटना सोबत होत्या.याप्रसंगी बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.कार्यक्रमाचे संयोजक तथा सत्यशोधक समाजाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे ,सत्यशोधक समाजाचे प्रचारक रवींद्र तितरे व सुरेश सपकाळे,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे समन्वयक ह.भ.प.मनोहर खोंडे ,सभासद राजकुमार गवळी , देवकाई प्रतिष्ठान अध्यक्ष चित्रकार सुनील दाभाडे सर , पुस्तक भिशीचे सुदाम बडगुजर ,युवराज वाघ कार्यकर्ते उपस्थित होते.      बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने मानवंदना देणाऱ्या भीमसागराला भर उन्हात थंड पाण्याची निःशुल्क सेवा आम आदमी पार्टी युवा आघाडी जळगाव तर्फे देण्यात आली.थंड जल क्षुधाशांत...

विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ...

Image
विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन .. शेंदूर्णी ता जामनेर:-प्रतिनिधी विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था दिल्लीची संलग्नित विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्यावतीने अंगणवाडी (शिशु वर्ग ), पूर्व प्राथमिक, प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक व पालकांसाठी पायाभूत स्तर एन.ई.पी. ( N..E.P. ) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ‌३ मे ते १३ मे २०२३ या कालावधीत अमळनेर जि. जळगाव येथे करण्यात आले आहे. आपल्यावर आलेली पालकत्वाची जबाबदारी हे निश्चितच कस लावणारी असते. प्रत्येक पालक आपल्या पाल्याला उत्तम दर्जेदार व संस्कारित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी विद्याभारती शिक्षक, पालक, हितचिंतक यांच्यासाठी दरवर्षी एका प्रशिक्षण व प्रबोधन वर्गाचे आयोजन करत असते नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे एन. इ. पी. २०२० सर्वत्र लागू करण्यात आले आहे. या धोरणात शालेय शिक्षणाचे टप्पे ५+३+३+ ४ असे आहेत. या प्रशिक्षणात एन. ई. पी. ची ही माहिती देण्यात येणार आहे. याच वर्गात सोबत एन.ई. पी. वर्ग, बालिका शिक्षण, संस्कृति ज्ञान परीक्षा, वैदिक गणित, योग व संगि...

महात्मा जोतिराव फुले यांना सत्यशोधक समाज संघासह विविध संघटनातर्फे अभिवादन.

Image
महात्मा जोतिराव फुले यांना सत्यशोधक समाज संघासह विविध संघटनातर्फे अभिवादन.       राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्ताने सत्यशोधक समाज संघ जळगाव यांच्या नेतृत्वाने विविध संघटनातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.       जळगाव येथे दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी फुले मार्केट मधील क्रांतीसूर्य तथा सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ, जळगाव सचिव एम.टी.लुले यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ' जय ज्योती जय क्रांती ' चा जयघोष यावेळी सर्वांनी करून महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव केला.    प्रारंभी सत्यशोधक समाजाचे जळगाव जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांनी प्रस्तावनेत सत्यशोधक समाज संघातर्फे महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाच्या वन टाईम राज्यव्यापी कार्यक्रमाची माहिती दिली. नंतर प्रचारक रवींद्र तितरे यांनी महात्मा फुले रचित सत्यशोधक समाजाची प्रार्थना उपस्थित फुले प्रेमींकडून स...

पाचोरा येथे एकदीवसीय मेकअप सेमिनार चे आयोजन.

Image
पाचोरा येथे एकदीवसीय मेकअप सेमिनार चे आयोजन. स्वतः साठी आणि ब्युटी पार्लर  व्यवसायात एक्सपर्ट होण्यासाठी  सुवर्ण संधी.पाचोरा शहरात एकदिवशीय  मुबई येथील नामांकित मेकअप आर्टिस्ट छाया जी मोरे यांचा पाचोरा येथे सोमवार दि. 10 एप्रिल   2023 रोजी  सकाळी 10 वाजता  सुरुवात होणार आहे. सेमिनार ठिकाण :-सुवर्णकार मंगल कार्यालय  प्रकाश टॉकीज जवळ देशमुख वाडी पाचोरा. आयोजक- भाग्यश्री मेकअप स्टुडिओ संचालिका भाग्यश्री सोनार व हिना शेख पाचोरा. सहकार्य - स्पर्श फोटो पाचोरा

ग्रामपंचायत मध्ये ही "स्विकृत ग्रामपंचायत सदस्य" नेमावे--- दिपक पवार यांची "ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांचे कडे केली मागणी"

Image
महानगरपालिका, नगरपालिका(नगरपंचायत)धर्तीवर ग्रामपंचायत मध्ये ही "स्विकृत ग्रामपंचायत सदस्य" नेमावे---पत्रकार दिपक पवार "ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांचे कडे केली मागणी" स्विकृत ग्रामपंचायत सदस्य चा विषय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवणार--ना.गिरीष महाजन लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी--- शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महानगरपालिका , नगरपालिका (नगरपंचायत)मध्ये ज्याप्रमाणे स्विकृत नगरसेवक शासनाच्या आदेशानुसार निवडले जातात. त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेचा ग्रामीण भागातील महत्त्वाचा घटक असलेल्या "ग्रामपंचायत मध्ये' ही ग्रामपंचायत सदस्यांच्या संख्या बळानुसार "स्विकृत ग्रामपंचायत सदस्य" निवडले जावेत,अशी मागणी महाराष्ट्रातील युवा वर्गाच्या वतीने लोहारा येथील दै.दिव्यमराठी चे युवा पत्रकार दिपक पवार यांनी राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण युवक क्रीडा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने महानगरपालिका,नगरपालिका(नगरपंचायत)धर्तीवर स्विकृत ग्रामपंचायत सदस्य नेमण्याचा शासन निर्णय(जी.आर)त्वरित काढावा.व महारा...

वृंदावन हॉस्पिटल पाचोरा व ग्रामविकास समिती अंजनविहरे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिना निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

Image
वृंदावन हॉस्पिटल पाचोरा व ग्रामविकास समिती अंजनविहरे यांच्या संयुक्त विद्यमाने* *जागतिक आरोग्य दिना निमित्ताने  मोफत आरोग्य तपासणी शिबिर.  शिबिराचे आयोजन ग्रामविकास समितीच्या माध्यमातून करण्यात आले.छ.शिवरायांचे प्रतिमा पूजन करून डॉ. निळकंठ पाटील यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला व  विविध आरोग्य योजना विषयी माहिती दिली.शिबिरास सुरवात केली.शिबीर साठी वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉ उपलब्ध होते त्यामध्ये  ग्रामविकास समिती अंजनविहरे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर किडनीस्टोन (मुतखडा),प्रोस्टेट ग्रंथी,हाडांचे आजार, लहान बाळांची तपासणी, बी.पी (ब्लडप्रेशर) ,शुगर,ईसीजी,तसेच मुळव्याद, भंगदर,यांची तपासणी केली .  श्री डॉ निळकंठ पाटील सर MBBS.D.Ortho(अस्थिरोग तज्ञ) डॉ भरत पाटील (MBBS,MD मेडीशीन) जनरल फीजीशन डॉ रोहन नाईक सर (MBBS,DCH बालरोग तज्ञ) डॉ प्रशांत महाराज सर (MBBS.DNB.युरोलोजिस्ट ) डॉ कल्पेश पाटील (मुळव्याध भंगदर तज्ञ) इ.डॉक्टरांची टीम या शिबिरासाठी मिळाली होती.

मूकबधिर निवासी विद्यालयाती विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न.

Image
मूकबधिर निवासी विद्यालयाती विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी  आज दि.  06/04/2023 रोजी मूक बधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडी येथील मेडिकल ऑफिसर डॉ शेखर डी पाटील व त्यांचे सहकारी डॉ अक्षय चक्के, डॉ उमेश भटकर, डॉ राहुल महाजन यांनी केली. सोबत आरोग्य सहाय्यक रमेश चौधरी व आरोग्य सेवक गजानन भाऊ यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील व ज्येष्ठ शिक्षक संजय पाटील शिक्षकेतर कर्मचारी शेनपडू तडवी, योगेश बडगुजर व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. शेखर पाटील व त्यांच्या टीमचे आभार मुख्याध्यापक यांनी मानले.

डॉ. अंजली ठाकरे हिचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे सत्कार...

Image
डॉ. अंजली ठाकरे हिचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे सत्कार. पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री .गो .से.  हायस्कूल शाळेचे उपमुख्याध्यापक एन .आर. ठाकरे. व कला शिक्षिका सौ जे.एन ठाकरे यांची कन्या डॉ. अंजली ठाकरे ही वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथून एम.बी.बी.एस अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन संजय वाघ. व्ह.चेअरमन व्ही.टी. जोशी. ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी. संजय पाटील यांच्या कडून  सत्कार करण्यात आला. तिला पुढील भविष्यात हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

पाचोऱ्यात महावीर जयंती निमित्ताने शोभायात्रा उत्साहात.

Image
पाचोऱ्यात महावीर जयंती निमित्ताने शोभायात्रा उत्साहात. पाचोरा : प्रतिनिधी शहरात आज महावीर जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. जैन समाजातील विविध घटक एकत्रित येत त्यांनी महावीर जयंतीच्या या उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला. शहरातील गांधी चौक समोरील जैन मंदिरा पासून  वासुपूज्य स्वामी जैन मंदिरात आज सकाळी जैन ध्वज वंदन करण्यात आले. त्यानंतर तेथून भव्य  शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत बँड पथकासह समाजातील सर्व बंधू भगिनी सहभागी झाले होते. ही शोभायात्रा जैन मंदिरापासून जामनेर रोड स्टेशन रोड देशमुखवाडी मार्गे  आल्यानंतर तिचा समारोप जैन मंदिर येथे झाला. या वेळी ठाकरे गटाच्या नेत्या सौ वैशाली सूर्यवंशी यांनी भेट देत सर्व जैन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या,

ग्राम विकास विद्यालय येथे पिंपळगाव हरेश्वर येथील आपदा मित्रांनी दिली आपत्ती बद्धल माहिती.

Image
ग्राम विकास विद्यालय येथे पिंपळगाव हरेश्वर येथील आपदा मित्रांनी दिली आपत्ती बद्धल माहिती. आज दि. 01/04/2023.रोजी पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालय व  कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय.येथे आपत्ती विषयावर माहिती देण्यात आली.यावेळी  आपदा मित्र शुभम नामदेव पाटील,वैभव शांतीलाल माहुरे,हर्षल बापू गीते.यांनी पूर,भूकंप, वीज, आग,या आपदावरती शालेय मुलांना माहिती दिली तसेच  आपदा किट याची माहिती दिली. येणारी घटना व झालेली घटना या विषयावर काय केलं पाहिजे यासाठी आपण काय उपाय योजना केल्या पाहिजे त्याची माहिती दिली,  आपल्या स्वतःचा संरक्षण आपण स्वतः  कसं करू शकतो  या विषयावर पूर्ण माहिती दिली. यावेळी ग्राम विकास विद्यालयातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद तसेच शाळेतील विध्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्तित होते. 

Viral Video: लग्नात स्पार्कल गनने स्टंटबाजी पडली महागात; वधूच्या चेहऱ्याजवळ झाला स्फोट.

Image
Viral Video: लग्नात स्पार्कल गनने स्टंटबाजी पडली महागात; वधूच्या चेहऱ्याजवळ झाला स्फोट.  https://youtube.com/shorts/EcUK-fq5jQE?feature=share आपले लग्न अविस्मरणीय व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकजण आपले लग्न खास बनवण्यासाठी विविध प्रयत्न करतात, पण कधी कधी अशा घटना घडतात, ज्याचा विचार करुनही मनात भीती वाटते. आजकाल लग्न आणि प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये स्टंटबाजी हा ट्रेंड बनला आहे. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ सिद्ध करतो की, असे स्टंट नेहमीच सुरक्षित असू शकत नाहीत. वधूसोबत घडली धक्कादायक घटना... व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू स्पार्कल गनसह पोज देताना दिसत आहे. पण, काही क्षणातच बंदुकीचा स्फोट होतो आणि थेट वधूच्या चेहऱ्यावर आगीचा लोळ आदळतो. घाबरलेली वधू किंचाळते आणि बंदूक फेकून देते. त्यानंतर आजूबाजूचे लोक वधूच्या मदतीसाठी धावतात. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा केला जात आहे. ट्विटरवर @Sassy_Soul_ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या क्लिपवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'आजकाल लोकांना काय झालंय...

प्रा.डॉ.संदीप शंकरराव पाटील यांना कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून संगणक अभियंत्रितकीतुन डॉक्टरेट(P.hd)पदवी प्रदान.

Image
प्रा.डॉ.संदीप शंकरराव पाटील यांना कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून संगणक अभियंत्रितकीतुन डॉक्टरेट(P.hd)पदवी प्रदान.  पिंपळगाव हरे.येथील रहिवाशी व श्रम साधना ट्रस्ट बांभोरी जळगाव संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा.डॉ.संदीप शंकरराव पाटील यांना कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून संगणक अभियंत्रितकीतुन डॉक्टरेट(P.hd)पदवी मिळविल्या बद्धल त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव व हार्दिक अभिननंदन होत आहे.  प्रा.डॉ.संदीप शंकरराव पाटील हे पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवाशी असून शंकरराव भिका पाटील (वायरमन) यांचे लहान चिरंजीव तसेच पिंपळगाव हरेश्वर येथील तंटामुक्ती अध्यक्ष अरुण पाटील यांचे लहान बंधू आहेत.

धर्मवीर संभाजी राजे चौक येथे श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन..

Image
धर्मवीर संभाजी राजे चौक येथे श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन. धर्मवीर संभाजी महाराज चौक पिंपळगांव हरेश्वर येथे आज दिनांक ३० मार्च रोजी श्री रामनवमी निमित श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी गणेश हटकर, मुकेश हटकर, दादू गरुड, शुभम तेली, अक्षय ठाकरे, दीपक गरुड, शुभम पवार, नयन सपकाळ, गणेश भाऊ भ, राकेश वाघे, पंकज सावळे, गोपाल खाटीक, आकाश धनगर, रवी गीते, किरण ट्रेलर, तसेच समाज बांधवांसह गावकरी मंडळी उपस्थित होते,

जळगांव - शिरसोली येथील जयदुर्गा भवानी क्रीडा मंडळ संचाशलत ओम साई शिक्षणिास्त्र महाशिद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.

Image
जळगांव - शिरसोली येथील जयदुर्गा भवानी क्रीडा मंडळ संचाशलत ओम साई शिक्षणिास्त्र महाशिद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला.  या स्नेह मेळाव्याच्या काययक्रमाचे उद्घाटन  व  दीप प्रज्वलन जळगाव नगरीच्या प्रथम नागशरक महापौर. सौ. जयश्रीताई महाजन यांच्या हस्त्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयावरील प्रेम ऋणानुबंध अधोरेखित होत असल्याचे मत  सौ. जयश्रीताई महाजन यांनी व्यक्त  केले. विद्यार्थी महाविद्यालय यांचे नाते “अपत्य व मातेप्रमाणे” असते असेही त्या म्हणाल्या या मेळाव्याला संस्थेचे सचिव . श्री. लशलत भाऊ धांडे, श्री. रविभाऊ बारी, प्रविण बारी, हे प्रमुख अशतथी म्हणून उपस्थित होते. सदर काययक्रमाचे प्रास्त्ताविक प्रभारी प्राचायय. डॉ. अर्चना भोसले यांनी केले, यावेळी कार्यक्रमाला सन २०१४ पासूनचे विद्याथी उपस्थित होते. यात बहुतेक विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठिणींना उजाळादिला . विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने त्यांना त्या त्या वेळी केलेल्या मदतीची आठवण  करून दिली आपल्या मनोगतातून प्र . प्राचार्य डॉ . अर्चना भोसले , डॉ .वर...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्ताने महिलांचे ऑनलाईन काव्य संमेलन उत्साहात.

Image
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्ताने महिलांचे ऑनलाईन काव्य संमेलन उत्साहात.      जळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी व जागतिक महिलादिनाच्या औचित्याने सत्यशोधक समाज संघ जळगाव आणि भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे ऑनलाईन खुले कवी संमेलन शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ.मायाताई धुप्पड असून प्रमुख अतिथी प्राध्यापक संध्या महाजन उपस्थित होत्या . प्रथमतः क्रांतीज्योती सावित्री मातेच्या प्रतिमेला देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुप्रसिद्ध चित्रकार सुनील दाभाडे यांनी पुष्पांजली अर्पण केली व उपस्थितांनी भावसुमने अर्पण केली.कवी संमेलनात सुनीता पाटील तालुकाध्यक्ष खानदेश साहित्य संघ अमळनेर  ( सृजनाचे वैभव ), प्रा.संध्या महाजन ( कवीतेचं बेट ),मंगल नागरे - देशमुख ( बाई ), मनीषा बिऱ्हाडे ( मी लेक सावित्रीची ),मंजुषा पाठक ( विसरू नको ),शैलजा करोडे ( कधी कधी ), जयश्री काळवीट ( उठा सावित्रीच्या लेकी ), पत्र...

शिरसोली येथील ओम साई शिक्षणशास्त्र महाविदयालयात स्नेह संमेलन सोहळा.. जल्लोषात साजरा करण्यात आला.

Image
प्रतिनिधी- शिरसोली -10-3-2023 शिरसोली येथील ओम साई शिक्षणशास्त्र महाविदयालयात स्नेह संमेलन सोहळा.. जल्लोषात साजरा करण्यात आला. शिरसोली येथील ओमा साई शिक्षणशास्र महाविद्यालय आज बि.येड, आय.टी.आय, डी. येड या तिघ विभागाच्या विद्यार्थी  प्राध्यापक, व प्राचार्य याचा सोबतस्नेह संमेलन हा सोहळा जलोष्यात साजरा करण्यात आला.. कार्यक्रम च्या सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य. डॉ. अर्चना भोसले मॅडम  प्राध्यापिका. डॉ. वर्षा बिऱ्हाडे मॅडम   प्राध्यापिका. आशा पाटील मॅडम  प्राध्यापिका. पूनम पाटील मॅडम  प्राध्यापक. विठ्ठल चव्हाण सर   प्राध्यापक. राहुल मराठे सर  रविभाऊ सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व  व सर्व विदयार्थी यांनी आपल्या कला गुणांचे सादरीकरण केले. नाटक, नृत्य गायन या कले द्वारे कार्यक्रमाची शोभा वाढली आणि शिक्षण आणि शिक्षक ही मजबूत बाजू देशाचे भविष्य बनवते आणि आपण चांगलेत चांगले शिक्षक घडऊ असे. प्राचार्य अर्चना भोसले मॅम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले....

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल विद्यालयास सु.भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिर पाचोरा इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची भेट.

Image
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल विद्यालयास सु.भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिर पाचोरा इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची  भेट. पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा शहरातील सुपडू भादू पाटील विद्यामंदिर विद्यार्थ्यांची श्री गो.से हायस्कूलला सस्नेह भेट विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरली .यावेळी इ.४ थी विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा सहभाग घेऊन बक्षीस मिळवली. विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल व उत्साह दिसून आला, विद्यार्थी भारावले होते पुढच्या वर्षी आपल्याला याच शाळेत यायचे असल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. शाळेची भव्य इमारत , क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगीत दालन, संगणक हॉल, कलादालन व तेथील कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले. विद्यार्थ्यांचे स्वागत व प्रमुख मार्गदर्शक मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन आर पाटील यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.आर बी बोरसे यांनी विद्यार्थ्यांना शाळेविषयी शाळेतील विविध उपक्रमाबद्दल व शिक्षकांविषयी माहिती दिली शाळेत विविध उपक्रम कसे साजरी करतात याची माहिती दिली. रंगभर...

पद्मवंशिय तेली समाज मंडळ, महाराष्ट्र राज्य तर्फे प्रति पंढरपूर पिंपळगाव हरे. येथे आज दि.14 फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन.

Image
१४ फेब्रु. २०२३ रोजी महाराष्ट्र पद्मवंशिय तेली समाज मंडळ, महाराष्ट्र राज्य तर्फे प्रति पंढरपूर पिंपळगाव हरे. येथे भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा  प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे  सर्व राज्यांतील वधू-वरांसाठी पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा येथे भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १४ फेब्रुवारी रोजी  केलेले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना रावसाहेब दानवे, ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण व युवक, क्रीडामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खासदार उमेश पाटील, खासदार रक्षा खडसे, पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रम हा श्री गोविंद समर्थांच्या पावनभूमीत श्री क्षेत्र प्रति पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा येथे १४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ०१:०५ मी संपन्न होणार आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी सर्व समाज बांधव इष्टमित्र...

विनोद विश्वनाथ महाजन यांची पीक पीक संरक्षण सहकारी संस्था चेअरमन पदी बिनविरोध निवड.

Image
  विनोद विश्वनाथ महाजन यांची पीक पीक संरक्षण सहकारी संस्था चेअरमन पदी बिनविरोध निवड. पीक संरक्षण सहकारी संस्था  पिंपळगाव हरेश्वर. ता. पाचोरा जि.जळगाव  चेअरमन  पदी विनोद महाजन  यांची बिनविरोध निवड...तसेच व्हाईस चेअरमन पदी उत्तम दगडू सावळे यांची निवड करण्यात आली. यावेळी हरी हरेश्वर मंदिर संस्थान अध्यक्ष, विश्वस्त, गोविंद महाराज मंदिर संस्थान अध्यक्ष व विश्वस्त, तसेच सर्व पीक संरक्षण सहकारी संस्था  पिंपळगाव हरेश्वर.येथील चेअरमन,व्हाईस चेअरमन, सचिव, गावातील ग्रामस्थ उपस्तित होते...

पोलीस स्टेशन पिंपळगाव हरे येथे शिव जयंती,महाशिवरात्री व शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर शांतता कमेटी बैठक संप्पन्न.

Image
पोलीस स्टेशन पिंपळगाव हरे येथे शिव जयंती,महाशिवरात्री व शिव महापुराण कथेच्या नियोजनासाठी शांतता कमेटी मिटिंग संप्पन्न. पिंपळगाव हरेश्वर येथे येणाऱ्या आगामी  महाशिवरात्री, शिव जयंती,, व शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद वाघमारे यांच्या उपस्तित  हरेश्वर मंदिर संस्थान अध्यक्ष, विश्वस्त, तंटा मुक्ती अध्यक्ष,पत्रकार, तसेच गावातील ग्राम पंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती शिव जन्मोत्सव समिती पिंपळगाव हरेश्वर व ग्रामस्थ पि.हरे.यांच्या उपस्तित पार पडली. यावेळी स.पो . नि. महेंद्र वाघमारे यांनी सर्व आगामी उत्सव शांततेच्या मार्गाने पार पडावे यासाठी मार्गदर्शन केले तसेच गावातील प्रतिष्टीत व्यक्तींनी आपआपले मत मांडले. यावेळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस नाईक अरुण राजपूत,हरी हरेश्वर मंदिर संस्थान अध्यक्ष, सर्व विश्वस्त, शिव जन्मोत्सव समिती तरुण. वर्ग, ग्राम पंचायत सदस्य, तंटा मुक्ती अध्यक्ष, पत्रकार, गावातील ग्रामस्थ, उपस्तित होते. 

पिंपळगाव हरेश्वर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आमदार फंडातून हरिहरेश्वर मंदिर येथे फेवर ब्लॉकचे उद्घाटन संप्पन्न...

Image
पिंपळगाव हरेश्वर येथे  आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आमदार फंडातून हरिहरेश्वर मंदिर येथे फेवर ब्लॉकचे उद्घाटन संप्पन्न... पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर मंदिर परिसरात पाचोरा भडगाव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार माननीय किशोर आप्पा पाटील यांच्या आमदार फंडातून फेवर ब्लॉक बसवण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटक प्रसंगी गावातील  ज्येष्ठ नागरिक गोविंदा काका येवले, श्याम काका पाटील, रवी भाऊ गीते,  ईश्वर भाऊ पाटील ,पांडुरंग तेली, सुदाम भाऊ पाटील ,बाजीराव गीते, किरण टेलर ,बालूराम दादा रामसे ,मुकेश चौधरी ,अल्लाउद्दीन तडवी ,विजय काळे ,राकेश वाघे ,गणेश भवर, शुभम पाटील, पवन तेली, भूषण पाटील ,गोविंदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तसेच ग्रामस्थांच्या वतीने माननीय कार्यसम्राट आमदार यांचे आभार मानण्यात आले. 

भडगांव येथील श्री साई समर्थ 'फार्मसी' विभागात नवीन वर्षातील विद्यार्थी याचे स्वागत.

Image
  भडगांव येथील श्री साई समर्थ 'फार्मसी' विभागात नवीन वर्षातील विद्यार्थी याचे स्वागत. भडगांव येथील श्री साई समर्थ 'फार्मसी' विभागातर्फे  द्वितीय वर्षातील विद्यार्थी यांनी प्रथम वर्षी आलेल्या विद्यार्थी याचे याचे स्वागत केले व  'मेडिसिन' क्षेत्रातील विविध विभागातील मान्यवारना बोलावून नवीन वर्षातील विद्यार्थ्यांचे मार्ग दर्शन केले.. या प्रसंगी साई समर्थ चे अध्यक्ष भैयासाहेब पाटील, प्रिंसिपल महेंद्र पाटील, व आय.टी.आय विभागाचे प्रवीण पाटील, सी बी यस सी स्कूल च्या निर्मल पाटील मॅम या प्रसंगी हजर होत्या.शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होणे आणि देशातील भविष्याचा पाया मजबूत होणे यासाठी विविध विभाग आम्ही आणत आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत.असे श्री साई समर्थ चे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी सांगितले..

पिंपळगांव हरेश्वरला बंदी असलेला गुटखा महागला;टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद तर, गुटखा व्यापाऱ्यांची मात्र जत्रा.

Image
पिंपळगांव हरेश्वरला बंदी असलेला गुटखा महागला;टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद तर, गुटखा व्यापाऱ्यांची मात्र जत्रा. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे बंदी असलेला गुटखा महागला  असल्याची जोरदार चर्चा पिंपळगाव हरेश्वर  परिसरात सुरू आहे. महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असली तरी पिंपळगाव हरेश्वर  मध्ये जागोजागी गुटखा विक्री होतांना दिसून येत आहे  त्यामुळे गुटखा बंदी कोठे आहेत ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहेत. गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र पाचोरा  तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे बनले असून रोज लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असल्याचे बोलल्या जात आहेत. गुटखा बंदीचे अधिकारी नावालाच ? कोठे गुटखा असेल किंवा विक्री होत असेल तर त्या ठिकाणी कारवाई करून पोलिसात गुन्हा दाखल करावा यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते मात्र पिंपळगाव हरेश्वर  येथे गुटखा विक्री खुलेआम सुरू आहेत त्यामुळे संबंधित अधिकारी कोठे आहेत ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहेत. गुटखा बंदीचे अधिकारी नावालाच असल्याचे सर्वसामान्य...

भाऊबीजेला बहिणीच्या भेटीसाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा वालझिरी येथे पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू..

Image
भाऊबीजेला बहिणीच्या भेटीसाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा वालझिरी येथे पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू - पाचोरा येथील चौधरी कुटुंबियावर काळाचा घाला... *पाचोरा, प्रतिनिधी* !       भाऊबीजेचा पवित्र सण साजरा करण्यासाठी आपल्या लाडक्या बहिणीचे आशिर्वाद घेण्यासाठी गेलेल्या पाचोरा येथील १७ वर्षीय युवकाचा वालझिरी (चाळीसगाव) येथील नदीपात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २७ आॅक्टोबर रोजी घडल्याने चौधरी कुटुंबियावर काळाने घाला घातला आहे.      याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील श्रीराम नगर, सिंधी काॅलनी, जामनेर रोड, पाचोरा येथील रहिवाशी राहुल सुरेश चौधरी (वय - १७) हा युवक दि. २७ आॅक्टोबर रोजी भाऊबीजेसाठी आपल्या बहिणीकडे गेला होता. आपल्या बहिणीचे आशिर्वाद घेत मोठ्या उत्साहात भाऊबीज हा पवित्र सण साजरा करण्यात आला. दरम्यान दि. २७ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास राहुल हा वालझिरी (चाळीसगाव) येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. दरम्यान नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता अचानक राहुल याचा पाय घसरून तो थेट ...