पोलीस स्टेशन पिंपळगाव हरे येथे शिव जयंती,महाशिवरात्री व शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर शांतता कमेटी बैठक संप्पन्न.
पोलीस स्टेशन पिंपळगाव हरे येथे शिव जयंती,महाशिवरात्री व शिव महापुराण कथेच्या नियोजनासाठी शांतता कमेटी मिटिंग संप्पन्न.
पिंपळगाव हरेश्वर येथे येणाऱ्या आगामी महाशिवरात्री, शिव जयंती,, व शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद वाघमारे यांच्या उपस्तित हरेश्वर मंदिर संस्थान अध्यक्ष, विश्वस्त, तंटा मुक्ती अध्यक्ष,पत्रकार, तसेच गावातील ग्राम पंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती शिव जन्मोत्सव समिती पिंपळगाव हरेश्वर व ग्रामस्थ पि.हरे.यांच्या उपस्तित पार पडली.
यावेळी स.पो. नि. महेंद्र वाघमारे यांनी सर्व आगामी उत्सव शांततेच्या मार्गाने पार पडावे यासाठी मार्गदर्शन केले तसेच गावातील प्रतिष्टीत व्यक्तींनी आपआपले मत मांडले.
यावेळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस नाईक अरुण राजपूत,हरी हरेश्वर मंदिर संस्थान अध्यक्ष, सर्व विश्वस्त, शिव जन्मोत्सव समिती तरुण. वर्ग, ग्राम पंचायत सदस्य, तंटा मुक्ती अध्यक्ष, पत्रकार, गावातील ग्रामस्थ, उपस्तित होते.
Comments
Post a Comment