महात्मा जोतिराव फुले यांना सत्यशोधक समाज संघासह विविध संघटनातर्फे अभिवादन.
महात्मा जोतिराव फुले यांना सत्यशोधक समाज संघासह विविध संघटनातर्फे अभिवादन.
राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्ताने सत्यशोधक समाज संघ जळगाव यांच्या नेतृत्वाने विविध संघटनातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
जळगाव येथे दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी फुले मार्केट मधील क्रांतीसूर्य तथा सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला विश्वकर्मामय
पांचाळ सहाय्यक मंडळ, जळगाव सचिव एम.टी.लुले यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ' जय ज्योती जय क्रांती ' चा जयघोष यावेळी सर्वांनी करून महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव केला.
प्रारंभी सत्यशोधक समाजाचे जळगाव जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांनी प्रस्तावनेत सत्यशोधक समाज संघातर्फे महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाच्या वन टाईम राज्यव्यापी कार्यक्रमाची माहिती दिली. नंतर प्रचारक रवींद्र तितरे यांनी महात्मा फुले रचित सत्यशोधक समाजाची प्रार्थना उपस्थित फुले प्रेमींकडून सामुदायिकपणे म्हणून घेतली. अभिवादन कार्यक्रमास देवकाई प्रतिष्ठान जळगावचे अध्यक्ष चित्रकार सुनील दाभाडे ,विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ जळगावचे उपाध्यक्ष निलेश सोनवणे ,खजिनदार मनोहर रुले, अथर्व प्रकाशन जळगाव प्रतिनिधी सुनिल पाटील तसेच भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावचे क्रियाशील कार्यकर्ते हितेंद्र धांडे सर त्याचप्रमाणे कवयित्री नीता विसावे,तुकाराम विसावे सर , कार्यकर्ते चंद्रकांत थोरात आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन हेमंत धांडे सर व आभार प्रदर्शन सुनिल दाभाडे यांनी केले.
Comments
Post a Comment