ग्राम विकास विद्यालय येथे पिंपळगाव हरेश्वर येथील आपदा मित्रांनी दिली आपत्ती बद्धल माहिती.
ग्राम विकास विद्यालय येथे पिंपळगाव हरेश्वर येथील आपदा मित्रांनी दिली आपत्ती बद्धल माहिती.
आज दि. 01/04/2023.रोजी पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालय व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय.येथे आपत्ती विषयावर माहिती देण्यात आली.यावेळी आपदा मित्र शुभम नामदेव पाटील,वैभव शांतीलाल माहुरे,हर्षल बापू गीते.यांनी पूर,भूकंप, वीज, आग,या आपदावरती शालेय मुलांना माहिती दिली तसेच आपदा किट याची माहिती दिली. येणारी घटना व झालेली घटना या विषयावर काय केलं पाहिजे यासाठी आपण काय उपाय योजना केल्या पाहिजे त्याची माहिती दिली, आपल्या स्वतःचा संरक्षण आपण स्वतः कसं करू शकतो या विषयावर पूर्ण माहिती दिली. यावेळी ग्राम विकास विद्यालयातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद तसेच शाळेतील विध्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्तित होते.
Comments
Post a Comment