Posts

Showing posts from July, 2026

आषाढी यात्रेनिमित्त मुक्तानंद भजनी मंडळाची सुरेल भजनसेवा; भाविक मंत्रमुग्ध.

Image
आषाढी यात्रेनिमित्त मुक्तानंद भजनी मंडळाची सुरेल भजनसेवा; भाविक मंत्रमुग्ध. पिंपळगाव हरेश्वर | प्रतिनिधी दिपक मुलमुले  श्रीक्षेत्र प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री समर्थ गोविंद महाराज मंदिर, पिंपळगाव हरेश्वर येथे सुरू असलेल्या आषाढी यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुक्तानंद भजनी मंडळ यांनी मंदिर परिसरात अत्यंत सुरेल व भक्तिरसपूर्ण भजनसेवा सादर केली. विठ्ठल-रुक्मिणी व श्री समर्थ गोविंद महाराज यांच्या नामस्मरणाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला. मंडळाच्या सुमधुर भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले असून, त्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तिभावाने सहभाग नोंदवला. भजनसेवेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्याचे तसेच समाजात अध्यात्म, संस्कार आणि एकात्मतेचा संदेश देण्याचे कार्य मुक्तानंद भजनी मंडळाने प्रभावीपणे केले. मंदिर संस्थानच्या वतीने मंडळातील सर्व भजनसेवकांचे कौतुक करण्यात आले. आषाढी यात्रेदरम्यान अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकां...

प्रा. सौ. जयश्रीताई कोमल वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून गौरवास्पद नियुक्ती.

Image
 प्रा. सौ. जयश्रीताई कोमल वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून गौरवास्पद नियुक्ती. मुख्य संपादक :-दिपक मुलमुले 9595470800 महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण मिळावे, तसेच लैंगिक छळाच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समित्यांवरील अशासकीय सदस्यांची सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत लिनेस क्लब पाचोरा अध्यक्षा तथा श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील प्राध्यापिका प्रा. सौ. जयश्रीताई कोमल वाघ यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ अंतर्गत कार्यरत असलेल्या या समित्यांवर महिलांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असते. तसेच सुरक्षित कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी जनजागृती, मार्गदर्शन आ...

सामाजिक कार्यकर्त्या श्वेता सीमा विनोद पाटील यांना उद्या मिळणार यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६

Image
सामाजिक कार्यकर्त्या श्वेता सीमा विनोद पाटील यांना उद्या मिळणार यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ पिंपळगाव प्रतिनिधी :-दिपक मुलमुले(पाटील) पिंपळगाव हरे येथील सामाजिक कार्यकर्त्या श्वेता सीमा विनोद पाटील यांना विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या कार्याची दखल घेत 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६' प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात साहित्य व युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून, पुरस्कारार्थी म्हणून श्वेता सीमा विनोद पाटील यांचा सन्मान करण्यात येईल. हा पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष, यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. श्वेता सीमा विनोद पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.