पद्मवंशिय तेली समाज मंडळ, महाराष्ट्र राज्य तर्फे प्रति पंढरपूर पिंपळगाव हरे. येथे आज दि.14 फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन.

१४ फेब्रु. २०२३ रोजी महाराष्ट्र पद्मवंशिय तेली समाज मंडळ, महाराष्ट्र राज्य तर्फे प्रति पंढरपूर पिंपळगाव हरे. येथे भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा 
प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे  सर्व राज्यांतील वधू-वरांसाठी पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा येथे भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १४ फेब्रुवारी रोजी  केलेले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना रावसाहेब दानवे, ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण व युवक, क्रीडामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खासदार उमेश पाटील, खासदार रक्षा खडसे, पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत उपस्थित राहणार आहे.

सदर कार्यक्रम हा श्री गोविंद समर्थांच्या पावनभूमीत श्री क्षेत्र प्रति पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा येथे १४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ०१:०५ मी संपन्न होणार आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी सर्व समाज बांधव इष्टमित्र कुटुंब, सहपरिवार उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. 

महाराष्ट्र राज्य पद्मवंशिय तेली समाज मंडळामार्फत अशा प्रकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे नियमित आयोजन करण्यात येत असते. यापूर्वी देखील २००७, २००९, २०११, २०१३, २०१७, २०१९ इत्यादी वर्षी सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला होता. असंख्य वधूवरांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाजाच्या नविन कमेटीने देखील यावर्षी सामूहिक विवाहाचे आयोजन केले आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाने समाजातील गरजू, गरीब, श्रीमंत व सर्व स्तरावरील समाज बांधवांना एकत्र येण्याची संधी मिळते व यातून समाजाचा वेळ, पैसा इत्यादी गोष्टी चा फायदा होतो. 

सामूहिक विवाह सोहळ्यासाठी समाजातून भरभरून आर्थिक प्रतिसाद मिळाला. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण समाजातून लाखोंची वर्गणी जमा झाली असून ती विवाह सोहळ्यासाठी वापरण्यात येणार आहे. वधू-वरांकडून नाममात्र फी घेऊन वधू-वरांना याप्रसंगी बेले मनी मंगळसूत्र कपडे भांड्यांचा आहेर इत्यादी वस्तू देण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पद्मवंशिय तेली समाजाचे अध्यक्ष डॉ शांतीलाल गेंदिलाल तेली, उपाध्यक्ष शिवा पांडुरंग झलवार, उपाध्यक्ष सौ अलका ईश्वरलाल लहिवाल, सचिव राजेंद्र गोविंदलाल ढाकरे, सहसचिव राजेंद्र दिगंबर चौधरी, कार्याध्यक्ष प्रभूलाल रामलाल झारेवाल, सहकार्य अध्यक्ष प्रकाश नारायण दसरे कोषाध्यक्ष दीपक माणिकचंद मंडावरे, सहकोष अध्यक्ष संजय सुकलाल झेरवाल, युवा अध्यक्ष संदीप मोतीलाल सरताळे, सहयुवा अध्यक्ष संदीप सूपडू ढाकरे, प्रसिद्धी प्रमुख तथा वस्तीगृह इन्चार्ज चुनीलाल मोतीलाल उदने , तसेच महाराष्ट्र कमिटीचे सदस्य मच्छिंद्रनाथ नामदेव मंगरूळे, सुरेश हिराचंद असरवाल, दीपक भगवान झलवार, सुनील दगडू बिंदवाल, संजय सुकलाल पांचोले, राजेंद्र नेमीचंद नगरे , कचरू राजमल बालोदे, कन्हैयालालजी आनंदीलालजी राठोड, प्रा डॉ रत्ना दशरथ नगरे, नारायण उखर्डू ढाकरे, भास्कर रामदास मंगरुळे, मनोज राधाकिसन सरताळे, जितेंद्र रामधन माहोर, संतोष राजमल नैनाव,  प्रा अमोल प्रभाकर झेरवाल, भगवान राधाकिसन ढाकरे, कैलास रामदास झलवार, प्रकाश मोतीलाल झलवार, गणेश विठ्ठल माहोर, डॉ संजय मनोहर तेली, डॉ प्रशांत शांतीलालजी चौधरी, कृष्णा गंगाराम अजमेरे, पोपट विठ्ठल नगरे हे मेहनत घेत आहेत. या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी कार्यवाहक म्हणून पिंपळगाव हरेश्वर, अजिंठा, औरंगाबाद, जामनेर, सिल्लोड,  पाचोरा, गोंदेगाव, बनोटी, वाघारी, रांजणी, जामठी, शिंदाड, अटलगव्हाण, जळगाव, बिलवाडी, शेंदुर्णी, निंबायती, कांकराळा, फर्दापूर, कुऱ्हाड , खडकदेवळा ही गावे काम बघणार आहे तर व्यवस्थापक म्हणून तिडका, पहुरी, मुंबई, मोराड, साक्री, निजामपूर, वर्धा, कन्नड, नाचनवेल, धुळे, श्रीरामपूर, सोयगाव, वरखेडी तांडा, वाकी, सारगाव, मोहखेडा, वांगी, बोरगाव बाजार, धानोरा पिंपळदरी, पांगरी, जालना, पुणे- कात्रज, सांगवी, विरगाव, नाशिक, नागपूर व नायगाव हे कामकाज बघणार आहे. तसेच सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंपळगाव हरेश्वर येथील स्थानिक मिरवणूक समिती, भोजन समिती, वधू वर कक्ष समिती, साहित्य वाटप समिती, पाणी समिती, बॅनर समिती, लाइटिंग समिती, व्यवस्थापन समिती, संगणक समिती, ओम हवन समिती, आरोग्य समिती, स्वच्छता समिती, चहापाणी समिती, महिला समिती, इत्यादी समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.