पिंपळगांव हरेश्वरला बंदी असलेला गुटखा महागला;टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद तर, गुटखा व्यापाऱ्यांची मात्र जत्रा.
पिंपळगांव हरेश्वरला बंदी असलेला गुटखा महागला;टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद तर, गुटखा व्यापाऱ्यांची मात्र जत्रा.
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे बंदी असलेला गुटखा महागला असल्याची जोरदार चर्चा पिंपळगाव हरेश्वर परिसरात सुरू आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असली तरी पिंपळगाव हरेश्वर मध्ये जागोजागी गुटखा विक्री होतांना दिसून येत आहे त्यामुळे गुटखा बंदी कोठे आहेत ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहेत. गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे बनले असून रोज लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असल्याचे बोलल्या जात आहेत.
गुटखा बंदीचे अधिकारी नावालाच ? कोठे गुटखा असेल किंवा विक्री होत असेल तर त्या ठिकाणी कारवाई करून पोलिसात गुन्हा दाखल करावा यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते मात्र पिंपळगाव हरेश्वर येथे गुटखा विक्री खुलेआम सुरू आहेत त्यामुळे संबंधित अधिकारी कोठे आहेत ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहेत. गुटखा बंदीचे अधिकारी नावालाच असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात असून महाराष्ट्र शासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहेत.
महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी केलेली असली तरी पिंपळगाव हरेश्वर मध्ये ठीक ठिकाणी गुटखा विक्री होत आहेत गुटखा पिंपळगाव हरेश्वर येथील मोठ्या व्यापाऱ्यांकडून सहज उपलब्ध होत असल्याने जागोजागी मिळत आहेत त्यामुळे गुटखा विक्रीची इच्छा नसतानाही गुटखा विक्री करावी लागते असे काही टपरी चालक बोलत असल्याची धक्कादायक चर्चा पिंपळगाव हरेश्वरसह परिसरात सुरू आहेत.
१० रुपयाला मिळणारा गुटख्याची पुडी आता १२ रुपयाला विक्री होत आहेत तर २० रुपयाला मिळणारी गुटखा पुडी २५ रुपयाला विक्री होत असल्याची जोरदार चर्चा पिंपळगाव हरेश्वर तसेच परिसरात सुरू आहेत.
व्यापाऱ्यांनी गुटखा पुड्याचे भाव वाढविल्याने टपरी चालकांनीही गुटखा पुडीचे भाव वाढविले असल्याचे बोलल्या जात आहेत टपरी चालकाने दहा ऐवजी 12 रुपयांची मागणी ग्राहकाकडे केल्यानंतर टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बोलल्या जात असून टपरी चालक त्रस्त झाले असल्याची चर्चा चांगलीच पिंपळगाव हरेश्वर परिसरात सुरु आहे.
बंदी असलेला गुटखा पिंपळगाव हरेश्वर मध्ये खुलेआम सुरू आहेत त्यामुळे हे अपयश अधिकाऱ्यांचे आहेत की कर्मचाऱ्यांचे ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहेत.
Comments
Post a Comment