भाऊबीजेला बहिणीच्या भेटीसाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा वालझिरी येथे पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू..
भाऊबीजेला बहिणीच्या भेटीसाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा वालझिरी येथे पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू
- पाचोरा येथील चौधरी कुटुंबियावर काळाचा घाला...
*पाचोरा, प्रतिनिधी* !
भाऊबीजेचा पवित्र सण साजरा करण्यासाठी आपल्या लाडक्या बहिणीचे आशिर्वाद घेण्यासाठी गेलेल्या पाचोरा येथील १७ वर्षीय युवकाचा वालझिरी (चाळीसगाव) येथील नदीपात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २७ आॅक्टोबर रोजी घडल्याने चौधरी कुटुंबियावर काळाने घाला घातला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील श्रीराम नगर, सिंधी काॅलनी, जामनेर रोड, पाचोरा येथील रहिवाशी राहुल सुरेश चौधरी (वय - १७) हा युवक दि. २७ आॅक्टोबर रोजी भाऊबीजेसाठी आपल्या बहिणीकडे गेला होता. आपल्या बहिणीचे आशिर्वाद घेत मोठ्या उत्साहात भाऊबीज हा पवित्र सण साजरा करण्यात आला. दरम्यान दि. २७ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास राहुल हा वालझिरी (चाळीसगाव) येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. दरम्यान नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता अचानक राहुल याचा पाय घसरून तो थेट खोल पाण्यात पडला. सदरचा प्रकार त्याचे सोबत असलेल्या चिमुकल्यांनी परिवारातील सदस्यांना सांगितला असता तात्काळ उपस्थितांच्या मदतीने राहुल यास पाण्यातुन बाहेर काढण्यात आले. व लागलीच चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी राहुल यास मृत घोषित करताच कुटुबिंयांनी एकच हंबरडा फोडला. मयत राहुल चौधरी याचे पाश्चात्य वृद्ध आई, बहिण, पाहुणे असा परिवार असुन राहुल चौधरी याचे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचा राहुल याचे दुर्दैवी मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.
Comments
Post a Comment